सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमधील गावात अवैध दारू धंद्यांना ऊत..

▪️राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन हप्ते खाऊन सुस्त..

▪️ग्रामीण भागातील हॉटेल मध्येही बार सारखी केली जाते दारू विक्री..

▪️संबंधित गावचा पोलीस बीट अंमलदारही हप्ता खाऊन मूग गिळून गप्प..

▪️तपासणी नाक्यावरून गोवा बनावटी दारुची गाडी सोडणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना करावे बडतर्फ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.२२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेडोपाडी अवैध दारू विक्रीला उधाण आले असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गोव्यावरून अवैध दारू येत असल्याने ग्रामीण भाग आता दारू तस्करांच्या दारू पुरवठ्यामुळे बेजार झाला आहे. तर गावातील युवक दारूच्या नशेत आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील हे दारूधंदे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी समूळ उच्चाटन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

कोणतेही काम नसलेले राज्य उत्पादन शुल्क अधिकारी फक्त शासकीय पगार व हप्ते खाऊन सुस्तावलेले आहेत. या विभागातील अधिकारी माहिती घेण्यासाठी केलेला फोन उचलण्याची तसदी घेत नाहीत. एवढे मुजोर अधिकारी आहेत.

वर्षाकाठी दहा-पंधरा धाडी टाकून गोवा बनावटीची दारू जप्त केली, तर मोठे शौर्य गाजवले. याप्रमाणे हे अधिकारी वागत आहेत. जप्त केलेली दारू परस्पर बाहेर विकली जात आहे. त्यामुळे त्यांच्या साठ्याचा तत्कालीन पंचनाम्यानूसार पंचनामा करण्याची आम्ही मागणी यापूर्वीच केली होती. या खात्यातील अधिकारी पैसे खाऊन-खाऊन सुस्तावलेले आहेत. त्यांना कशाची कदर नाही. जनतेशी देणेघेणे नाही. कोणीही मरूदे! पण आम्हाला हप्ता मिळुदेत! अशा वृत्तीचे हे अधिकारी या जिल्ह्यातून तडीपार होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आमचा उठाव सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सुस्तावलेले असतील, काम करत नसतील तर पोलिस प्रशासनाने याची दखल घेऊन गावोगावी चाललेले हे दारू धंदे उध्वस्त करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा , कसाल, मालवण, कणकवली, वैभववाडी, देवगड या  तालुक्यांमध्ये खेडोपाडी मोठ्या प्रमाणात अवैध दारू धंद्याला उत आला आहे. विशेष म्हणजे या धंद्यात सोळा ते वीस वर्षाचे युवक झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने उतरले आहेत. मिळेल त्या वाहनाने गोळ्यातून अवैध दारू सिंधुदुर्गात आणून तीची विक्री केले जाते. त्यामुळे प्रत्येक गावात युवक व्यसनाधीन होऊन अल्पावधीत आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत. त्याला आळा घालायचा असेल, तर प्रत्येक गावांमध्ये दारूबंदी होणे गरजेचे आहे. पोलीस पाटील यांना हाताशी धरून या गावांमध्ये दारू धंदे करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांचे अड्डे उध्वस्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

काही गावांमध्ये तर हॉटेलच्या नावाखाली परमिट बार चालवला जातो. हॉटेल मध्ये बसून ग्राहकांना दारु  दिली जाते. ही सर्व दारु गोव्यामधून आणली जाते. हे पोलिस प्रशासनाला माहीत असतानाही पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसते. संबंधित पोलीस त्याला जबाबदार असल्याने व त्यांना ही हप्ता मिळत असल्याने ते याबाबत चकार शब्द काढत नाहीत. हा सगळा प्रकार म्हणजे ‘पोलीस भाऊ आणि दारू वाला भाऊ दोघे मिळून वाटून खाऊ’ असा  चालला आहे.

त्याला नूतन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच गोव्यातून सिंधुदुर्गात येणारा अवैध मद्य साठा ज्या तपासणी नाक्यावरून गाडी पुढे सोडली जाते, त्या तपासणी नाक्यावरील पोलिसांना निलंबित करावे. जेणेकरून पोलीस असे पुढे धाडस करणार नाहीत व गोव्यातील अवैध दारू सिंधुदुर्गात येणे बंद होईल, विशेषत: आरोंदा, तेरेखोल यामार्गे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य साठा येत असतो व या ठिकाणी तपासणी नाकी असताना सुद्धा या गाड्या सोडल्या जातात. याचा अर्थ जर तो पोलिसांच्या तपासणी नाक्यावरील कर्मचारी हे दारु तस्करांकडून हप्ता घेत असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अशा पोलिसांची चौकशी करून त्यांच्या डुट्या बदलून कार्यक्षम पोलीस त्या ठिकाणी ठेवावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सिंधुदुर्गात अस्तित्वात असलेले राज्य उत्पादन शुल्क खाते हे कधीकाळी  होते की नाही हे जनतेला माहीत नव्हते. मात्र, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने याबाबत वारंवार उठाव केल्यावर गेंड्याच्या कातडीचे हे अधिकारी जागे झाले व कागदी घोडे नाचविण्यासाठी चार-पाच केसेस करू लागलेत व आम्ही अशा प्रकारच्या केसेस केल्या असे अभिमानाने सांगू लागलेत. मात्र, त्यांनी एक ध्यानात ठेवावे महाराष्ट्र शासनाने राज्य उत्पादन शुल्क हे खाते फक्त अवैध मार्गाने येणाऱ्या मद्य साठा यावर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केले आहे. त्यांचे हेच काम असते व त्यांना त्यासाठीच पगार देण्यात येतो. अन्य त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नसते. त्यामुळे त्यांनी अशा फुशारक्या  मारू नयेत. कारण ते कारवाई करतील तर जनतेवर उपकार करत नाहीत. त्यांचे कामच आहे ते व जनतेचे सेवक आहेत. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी करू नये. तसा तो केल्यास त्यांचे पीतळ उघडे केल्याशिवाय राहणार नाही. हे संबंधितांनी ध्यानी ठेवावे. कारण त्यांचे अनेक कारणाने आमच्याकडे पुराव्यानिशी उपलब्ध झाले आहेत. ते आम्ही आयुक्तांना सादर करून यांचा भांडाफोड निश्चितच करू हे संबंधितांनी ध्यानी ठेवावे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!