भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी अवैध धंद्याविरोधात घेतलेली भूमिका कौतुकास्पद..
▪️कोकण लाईव्ह व विरोधी पक्ष्यांच्या रेट्यामुळे दारू, जुगार, मटका काही काळ बंद करण्याचे आदेश तर वाळू माफीयांवर होणार कारवाई..
▪️कोकण लाईव्ह च्या आवाहनाला प्रतिसाद देत विरोधी पक्ष उतरले मैदानात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.११: भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी अवैध धंद्याबाबत जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा संपादक व एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी मनापासून अभिनंदन करत आहे. खरंतर कोकण लाईव्ह च्या भूमिकेनंतर मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही या अनैतिक धंद्याविरोधात आवाज उठवला होता. याबाबतची निवेदने जिल्हाधिकारी पोलिस, अधीक्षक, संबंधित ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आली होती, तर आज भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत आवाज उठवून दिवाळी नंतर याबाबत जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
श्री. तेली यांच्या या भूमिकेचे आम्ही मनापासून स्वागत व कौतुक करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यातून दिवसाकाठी येणारी करोडो रुपयांची दारू इतर अनैतिक धंदे, वाळू तस्करी, जुगार, मटका वैगरे याबाबत राजन तेली यांनी घेतलेली भूमिका खरोखरच कौतुकास पात्र आहे. सत्ताधारी याबाबत काही बोलत नसले, तरी आज ना उद्या त्यांना जन रेट्यासमोर नमते घेऊन प्रशासनाच्या मूग गिळून गप्प बसलेल्या भूमिकला विरोध करावाच लागेल.
शासकीय अधिकारी निद्रिस्त झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. राज्य सरकारने बंद केलेला गुटखा महाराष्ट्राच्या सर्वच भागात विकला जातो. सिंधुदुर्ग त्याला अपवाद नाही. सावंतवाडीत गुटखा साठ्याची दोन गोडाऊन उभी आहेत. मात्र, अधिकारी हप्ता खाऊन सुस्तावलेले आहेत. याविरुद्ध कोणी ना कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे म्हणून आम्ही कोकण लाईव्ह च्या माध्यमातून या विरुद्ध मोहिम उघडली. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणून सरकारवर प्रहार केले. विरोधकांनाही सोडले नाही.
राज्य शासनातील विरोधी प्रबळ पक्ष भाजप त्याचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली हे कुशल संघटक व बुद्धीव़त म्हणून ओळखले जातात. त्यांनी उशिरा का होईना, या अवैध धंद्याबाबत आवाज उठवण्याचे ठरविले व तसा इशाराही दिला. प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करावी अन्यथा दिवाळी नंतर जन आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.
वास्तविक गोव्यातून येणारी करोडो रुपयांची अवैध दारू सिंधुदुर्गात तसेच महाराष्ट्रात विकली जाते. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक नसलेले अधिकारी हफ्ता खाऊन-खाऊन गप्प बसले आहेत, तर वाळू माफिया, जुगार पंटर, मटका किंगही सुस्तावलेले आहेत. याबाबत सर्वच विरोधी पक्षांनी आपली भूमिका जाहीर केल्यावर प्रशासनाने संबंधित एजंटांना आपले धंदे बंद करण्यास सांगितले आहे. तात्पुरते का होईना, पण सर्व विरोधी पक्षांच्या रेटृयामुळे हे धंदे काही काळ बंद करावे लागले ते कायमस्वरूपी बंद होण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*
🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_