दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी करताहेत ‘तू मारल्यासारखे कर! मी रडल्यासारखे करतो’ चे नाटक..
▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाची खात्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी..
▪️ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात गोवा दारूची विक्री; अधिकारी नाचवतात कागदी घोडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.१७: ‘तू मारल्यासारखे कर! मी रडल्यासारखे करतो’ असे धोरण राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी खात्याचे पोलीस अधीक्षक श्री. तडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवलंबिले असून फक्त अवैध दारु विरूद्ध होणारी ओरड थांबविण्यासाठी काही ठिकाणी धाडीचे नाटक रंगवून कारवाई केली जात आहे. मात्र, आरोंदा, तेरेखोल, मार्गे होणारी गोवा बनावटीची दारूची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे व ग्रामीण भागात त्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात आहे. हे सर्व राज्य उत्पादन शुल्क ला माहिती असतानादेखील त्याकडे डोळेझाक करून ‘मी मारल्यासारखे करतो! तू रडल्यासारखे कर’ अशी भूमिका सध्या राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागाने घेतली आहे.
राज्य उत्पादन शुल्काच्या सिंधुदुर्ग विभागाच्या कामकाजाबद्दल गेले पंधरा दिवस सातत्याने उठाव केल्यावर सिंधुदुर्गातील नागरिकांना सिंधुदुर्गात राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी खाते कार्यरत असल्याचे लक्षात आले. अशाप्रकारचे कितीतरी संदेश आमच्या वाचकांनी आम्हाला पाठवले या खात्यातील अधिकाऱ्यांचा कधीही जनतेशी संबंधित नाही. त्यामुळे हे खाते अस्तित्वात आहे की नाही हेच कोणाला समजत नाही. या खात्यातील अधिकारी फक्त दोन नंबर धंदेवाले व परमिट धारक यांनाच माहिती असतात. त्यामुळे जनतेशी यांना काही ही सोयरसुतक नसते म्हणून आपण काही केले तर ते निभावून जाणार अशा भ्रमात राज्य उत्पादन शुल्कचे सिंधुदुर्गातील अधिकारी आजपर्यंत वावरत आलेत.
महाराष्ट्र शासनाने बनावटी दारूची तस्करी अन्य कर वसुली यासाठी या विभागाचे निर्मिती केली व त्या विभागाला फक्त हेच काम देण्यात आले. मात्र, या विभागातील अधिकारी शासकीय काम दाखविण्यासाठी काही ठराविक धाडी दाखवून कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल सोडतात. यासाठी त्यांना लाखो रुपये हप्ता मिळत असतो. त्यामुळे आता खाऊन-खाऊन सुस्तावलेले हे अधिकारी दोन नंबर धंदेवाले यांच्याकडून मागून केस घेतात व दोनच वर्षात ती केस मोकळी होते. अशा केसेस वेळी जप्त केलेला मुद्देमाल परस्पर विकण्याचे प्रकारही घडतात. मात्र, यांच्यावरच कोणाचाच अंकुश नसल्याने हे आजपर्यंत कोणाला जुमानले नाहीत. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने याविरुद्ध सतत उठाव केल्यावर या खात्याचे अधिकारी खडबडून जागे झाले व कारवाया करू लागलेत. या कारवाया फक्त कागदोपत्री कागदी घोडे नाचविण्यासाठीच होत्या, हे पून्हा सिध्द झाले आहे.
खात्यातील सर्व अधिकारी एकमेकांच्या पापात सामील आहेत. त्यामुळे आळी-मिळी गुप-चिळी असा प्रकार सुरू आहे. सावंतवाडी, कुडाळ, कसाल, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आदी भागातून शेकडो महिलांनी आम्हाला फोन केलेत, संदेश पाठवलेत. गोवा बनावटीची दारू बंद करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले व तुम्ही याबाबत उठाव करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्द दिला. त्या सर्व महिलांचे मी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो.
कोणी कितीही कोल्हेकुई केली, कीतीही टाहो फोडला तरी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. आमचा लढा असाच सुरू राहणार हे आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो.
आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागाने जो २०१५ ते २०२० या कालावधीत विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला आहे, त्याचा त्यावेळेच्या पंचनाम्यानुसार मोजमाप व्हावे व मोजमाप करताना सर्व क्षेत्रातील एक सदस्य घेण्यात यावा अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे आम्ही केली आहे व ती मान्य होईपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाची खात्यांतर्गत चौकशी होईपर्यंत आम्ही आमचे लिखाण असेच सुरू ठेवणार आहोत. एका विद्वानाने सरसकट दारूबंदी व्हायला पाहिजे अशी मागणी करत अकलेचे तारे तोडले आहेत. त्यालाही त्याच भाषेत आम्ही उत्तर दिले आहे. अशा प्रकरणात कोण कोणाचे समर्थन करतो, हे समजत नाही. मात्र, आमची बाजू सत्याची असल्याने आम्ही ती लावून धरणारच हे ठामपणे सांगू इच्छितो. राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रमाणे गोव्यातून अवैध मद्य साठा सिंधुदुर्गात येतो, त्याला सिंधुदुर्ग पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत. कारण या मार्गावर सिंधुदुर्ग पोलिसांची तपासणी नाकी आहेत. ज्याअर्थी त्या तपासणी नाक्यावरून या गाड्या सोडल्या जातात त्या तपासणी नाक्यावरचे पोलीस व दारू तस्करांचे साटेलोटे असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे सदरच्या तपासणी नाक्यावर ही नूतन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सरप्राईज भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.
गोव्यातील सिंधुदुर्गात येणारा अवैध मद्य साठा जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत हा उठाव असाच सुरू राहणार निश्चित!
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_