राजकारणातील बाप माणूस बबन साळगावकर..
▪️साळगावकर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.१६: बबन साळगावकर या नावातच अफलातून रसायन आहे.. बालपणापासूनच समाजकार्याची व लोकसेवेची आवड असलेले बबन …कधी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला व बबन चा बबनराव झाला हे समजलेच नाही.. यामागे त्यांचे अपार कष्ट, मेहनत व निरपेक्ष सेवाभावी वृत्ती कामी आली, राजकारण करत असताना जे रंजलेले, गांजलेले, गोर, गरीब, दिन दलित, वंचित, समाजाला न्याय देण्याचे काम बबन साळगावकर यांनी आपल्या कार्यातून केले.
गवळी नाक्यावरील शिवसेनेची शाखा हे बबन रावांचे न्यायमंदीर होते, खेड्यापाड्यातील समस्याग्रस्त नागरिक त्यांच्याकडे येऊन आपल्या समस्या मांडत असत व त्या समस्या आपल्यापरीने सोडविण्याचा प्रयत्न बबनराव प्रामाणिकपणे करीत असत. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदापासून ते वनसंरक्षण शासकीय कमिटी पर्यंत अशी अनेक पदे बनबनरावांनी भूषवली.
आमदारकीची चालून आलेली संधी ही काही कारणामुळे हुकली व शिवराम दळवी आमदार झाले, मात्र खचून जाणे बबनराव यांच्या अंगी नसल्यामुळे पून्हा त्याच ताकदीने ते उभे राहिलेत, राजकारणातील मतभेदांमुळे त्यांना शिवसेना पक्ष सोडावा लागला तरी शिवसेनेच्या बाळकडूची चव ते कधी विसरू शकले नाहीत, बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस ते शेवटपर्यंत साजरा करत असत.
शिवसेनेचे नगरसेवक, ते राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पुन्हा शिवसेनेचा नगराध्यक्ष असे तीन वेळा बबनराव नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेत, मात्र त्या खुर्चीला डाग लागेल असे कोणतेही काम त्यांच्या हातून झाले नाही, त्यांनी त्या खुर्चीवर बसून त्यांनी खुर्च्या सन्मान वाढवला व पावीत्र्य जपले. अनेकांची न होणारी कामे केलीत, पण कोणाकडूनही एक रुपयाची अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष भावनेने राजकारण केले. म्हणूनच त्याच आदराने आजही त्यांचे नाव घेतले जाते.
राजकारणातील एक निष्कलंक, निस्वार्थी, व्यक्ती म्हणून बबनरावांचे नाव आजही घेतले जाते, बबन साळगावकरांचे व आमचे राजकारणा पलीकडचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे त्यांना जवळून ओळखण्याचा मला योग आला, मैत्री जपावी व निभवावी ती बबन यांनेच, मित्राच्या अडचणीच्या वेळी पाहडा सारखे पाठीशी उभे राहणारे बबन साळगावकर हे वेगळेच रसायन आहे.
राजकारणात चढ, उतार हे असतातच चालून आलेली संधी नाकारणे हे मुर्ख पणाचे लक्षण मानले जाते. म्हणून आमदारकी च्या उमेदवारीची मिळालेली संधी वाट खडतर आहे, हे माहिती असतानाही बबन साळगावकर यांनी नाकारली नाही, तर ती स्विकारली. नगराध्य पदाची दोन वर्षे शिल्लक असताना त्यांनी त्या खुर्चीचा मोह सोडून आपले नशीब अजमावण्याचे ठरवले व निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्या ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले.
मध्यंतरीच्या काळ बबनरावांसाठी खडतर होता, मात्र राजकारणात कोण कधीच संपत नसतो आणि निरपेक्ष भावनेने सामाजिक व राजकीय काम करणारा माणूस तर नाहीच नाही.
मी ज्या ज्या वेळी मी बबन रावांना भेटायचो त्या,त्या,वेळी साळगावकर यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा मी पाहिली आहे, त्यामुळे मला नेहमी वाटते साळगावकरांचा काही काळ हा खडतर असला तरी भविष्यकाळ उज्वल आहे, आक्रमक स्वभावाचे साळगावकर जेवढे तापट आहेत तेवढेच हळवेही.
आपल्या कुटुंबावर ते ते मनापासून प्रेम करतात, सावंतवाडी शहराचे तेरा वर्षे नगराध्यक्ष पद भूषवले मात्र भ्रष्टाचाराला कधीही थारा दिला नाही, कुठचाही ठेकेदार असो तो त्यांच्या केबिनमध्ये कधीच गेला नाही, साधी राहणी उच्च विचारसरणी हे बबनराव यांचे गुण, मात्र जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असे बबनरावांचे झाले आहे. राजकारणातील आदर्श व्यक्ती म्हणून बबनराव कडे पाहिले जाते ,बबन साळगावकर यांच्या हातून काही राजकीय चुका घडल्या असतील मात्र त्या चूकी मागे होती ती राजकीय इच्छाशक्ती ,कोणालाही वाटते आपण आमदार ,खासदार ,मंत्री, व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे ,इच्छा बाळगणे, कधीच चुकीची नसते ,व ती संधी आली तर ती अजमावून पाहणे ही गरजेचे असते तेच साळगावकर यांनी केले, त्यामुळे नगराध्यक्ष पद सोडून चूक केली असे सांगून त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांनी नगराध्यक्ष पदी असताना कीती पारदर्शक व चांगले काम केले याची गणना केली तर निश्चितच चांगले होईल.
आज १६ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला श्री देव पाटेकर व ३६५ खेड्यांचा अधिपती उपरलकर ,देवी सातेरी रवळनाथ ,यांच्या चरणी एकच प्रार्थना करेन की बबन साळगावकर यांची पुढील कारकीर्द उज्वल राहू दे, यशाचा आलेख चढता राहूदेत.. त्यांचे जळी स्थळी काष्टी पाषाणी संरक्षण कर,जारन तारन मारन संमोहन वशीकरण यापासून त्यांचे संरक्षण कर व त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना व राजकारणातील देव माणसाला मनापासून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…
▪️सीताराम आत्माराम गावडे, संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल
▪️कोकण विभागीय अध्यक्ष ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशन
▪️संस्थापक अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब
▪️कार्याध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया पत्रकार संघ
▪️विशेष कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग
▪️सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष
▪️अ.भा. ग्राहक संरक्षण परिषद सदस्य
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_