जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत होडावडा येथील पूरस्थितीची पाहणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात नदी नाल्यांना पूर येऊन जनजीवन शुक्रवारी पूर्णपणे विस्कळीत झाले. दुपारी सावंतवाडी-वेंगुर्ला वाहतूक ठप्प झाली होती. या पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी खुद्द जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे होडावडे नदीपात्रावर दाखल झाले.
यावेळी त्यांच्यासोबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव, अधिकारी घाग, पोलीस अधिकारी, ट्राॅपिकचे कर्मचारी व अधिकारी, होडावडे सरपंच आदिती नाईक, उपसरपंच अंनन्या धावडे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनूसुचित प्रकार घडू नये किंवा जिवितहानी घडू नये यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे दक्षता घेत असल्याचे सांगितले दाभाडे यांनी सांगितले.