सातार्डेत बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी कुडाळच्या तरुणाला अटक
सातार्डेत बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी कुडाळच्या तरुणाला अटक
७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई
संजय भाईप ( सावंतवाडी)
गोव्यातून सातार्डामार्गे जिल्ह्यात होणार्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज कारवाई केली आहे. यात रॉयल ब्रँड व्हिस्कीच्या ७५ बॉक्समधून एकूण ३६०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. दारु व दारु वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार (एमएच ०२ एलडी ६६५१) असा एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी साईनाथ तात्या पवार (३५, रा. बांबर्डे तर्फ माणगाव, ता. कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सातार्डा रवळनाथ मंदिरसमोर आज करण्यात आली.
सदर कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशान्वये निरीक्षक पी. आर. पाटील, उपनिरीक्षक आर. जी. येवलुजे, के. डी. कोळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दीपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक पी. आर. पाटील करीत आहेत.