कलंबिस्त येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक राऊळ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते तिला काँग्रेस प्रवेश
कार्यकारी संपादक – आनंद धोंड
सावंतवाडी – सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत गावडे सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री महेन्द्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली कंलंबिस्त पंचक्रोशीतील जेष्ठ समाजसेवक तसेच निर्विवाद पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकिय योजनांचे अभ्यासु जाणकार श्री अशोक वासुदेव राऊळ यांनी काँग्रेस जेष्ठ काँग्रेसचे नेते तसेच सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते पक्ष प्रवेश देण्यात आला.
येत्या काही दिवसात माझे सर्व कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश घेतला जाईल असे श्री राऊळ यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. या प्रसंगी सांगेली जि.प. मतदार संघाचे विभागीय अध्यक्ष अँड गुरूनाथ आईर उपस्थित होते.

