नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत आंबोली येथील मधुर रामा गुरव याची निवड
नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत आंबोली येथील मधुर रामा गुरव याची निवड झाली आहे, त्यांनी इयत्ता पाचवी मधून नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दिली होती, बाहेरून मुले येऊन या जिल्ह्यात परिक्षा देत असल्याने स्थानिक मुलांवर अन्याय होतो या कारणास्तव शिवसेनेने परीक्षेच्या वेळी आंदोलन छेडले होते, मात्र स्थानिक मुले ही अभ्यास केला तर या परीक्षेत पास होतात असे हे मधुर रामा गुरव यांनी या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.
मधुर आंबोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होता, त्याने कोणतेही शिकवणी वर्ग न घेता नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसला व ती परीक्षा तो उत्तीर्ण झाला, त्याचे आंबोली पंचक्रोशीत अभिनंदन केले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष पाताडे यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.

