पत्रादेवी चेकपोस्टवर सव्वा तीन लाखांची दारु पकडली..

३ लाख २० हजार रुपयांच्या दारुसह १ लाख ८० हजारांचा टेम्पो असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बांदा १६: मुंबई गोवा महामार्गावर
गोव्यातून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असलेल्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात पत्रादेवी एक्साइज चेकपोस्टवर अबकारी खात्याने कारवाई केली. या कारवाईत ३ लाख २० हजार रुपयांच्या दारुसह १ लाख ८० हजारांचा टेम्पो असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गिरीश डी. जोशी (४५, रा. ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आज मध्यरात्री पत्रादेवी चेकपोस्टवर करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा टेम्पो (एमएच ०४ एफपी २४५४) पत्रादेवी चेकपोस्टवर तपासणीसाठी थांबविण्यात आला. उपनिरीक्षक दामोदर लोलीनकर यांना संशय आला. निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या उपस्थितीत टेम्पोचे सील तोडण्यात आले. यावेळी टेम्पो मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला.

टेम्पोत बीयर व व्हिस्कीसह सुमारे ३ लाख २० हजार रुपयांच्या दारुचे बॉक्स आढळून आले. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे१ लाख ८० हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर लोलीनकर, गार्ड दिगंबर कुंकळकर, बिंदेश पेडणेकर, अर्जुन गवस, असिस फर्नांडिस व विश्वास केणी यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!