कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

निवडणुकीवेळी तुमच्या नेत्यांनी जाहीर केलेले १०० कोटी कुठे राहीले???-अनारोजीन लोबो

तुमच्या नेत्यांनी १०० कोटी देतो बोललेले ते १०० रुपये सुद्धा दिले नाहीत

 

सावंतवाडी, दि. १७ : गेली अनेक वर्षे मी नगरसेवक आहे खायचेच असलेले, तर खुप काही केले असते, मात्र माझा तो पिंड नाही, मी कोणताही कंपास घोटाळा केलेला नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करणारे संजू परब काय करता हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांचे पोट भरत नाही. त्यांच्या बद्दल काय बोलावे, असा पलटवार शिवसेनेच्या जेष्ठ नगरेसेविका अनारोजीन लोबो यांनी आज केला..

दरम्यान आमच्या पालकमंत्र्यांनी निधी तरी दिला मात्र तुमचे नेते रविंद्र चव्हाण यांनी शंभर कोटी देतो, असे सांगून शंभर रुपये सुध्दा दिले नाहीत. निवडणूकीत बॅगा भरुन आणणारे तुमचे नेते शहराच्या विकासासाठी निधी का देत नाहीत. त्यामुळे तुमच्या नेत्याबद्दल बोला नगराध्यक्षांच्या खुर्चीत बसून नुसते आरोप करू नका, असे ही त्यांनी परब यांना सुनावले. काल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संजू परब यांनी लोबो यांच्यावर आरोप केले होते. त्याला लोबो यांनी आज उत्तर दिले. आपण कोणताही कंपास घोटाळा केला नाही, उलट अधिक रक्कमेची असलेली निविदा पुन्हा काढण्यास सांगितली उलट श्री परब यांनी “वॉटर एटीएम” मध्ये घोटाळा झाल्याचे माहीत असताना सुध्दा त्या ठेकेदाराची बिले अदा करण्याचा प्रयत्न केला. तो आम्ही हाणून पाडला त्याच मुळे परब यांना मिर्ची लागली आहे. लोबो पुढे म्हणाल्या, या ठीकाणी पालकमंत्री व आमदार दिपक केसरकर यांच्यावर टोकाला जावून टिका केली जात आहे. मात्र असाच प्रकार पुढे झाल्यास आम्ही खपवून घेणार नाही, बोलत नाही, याचा अर्थ वेगळा काढू नका,वेळ आल्यास तुमची अंडी पिल्ली बाहेर काढू “वॉटर एटीएम” मध्ये झालेला अपहार आपण बाहेर काढला मात्र त्या प्रकरणात कोठेही संजू परब यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टिका न करता आभार मानले पाहीजे होते. मात्र तसे त्यांनी केले नाही. उलट आपली चूक झाकण्याचा प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!