प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांकडून गडहिंग्लज तालुक्यातील काजू बागांची पाहणी व शेतकर्यांना मार्गदर्शन
🛑प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांकडून गडहिंग्लज तालुक्यातील काजू बागांची पाहणी व शेतकर्यांना मार्गदर्शन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी-सुनील आचरेकर
🎴 सिंधुदुर्ग,२७ : महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. विजयकुमार देसाई (कीटकशास्त्राचे शास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प अन्वेषक), श्री. प्रमोद तल्हा (वरिष्ठ संशोधन सहाय्यक) व डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी) यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कृषि विभागाचे श्री. एस. एम. रोकडे (गडहिंग्लज तालुका कृषि अधिकारी), श्री. एच. बी. बोंगे (मंडळ कृषि अधिकारी), कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे समवेत गडहिंग्लज तालुक्यातील काजू या पिकावरील किड व रोग यासंदर्भात शेतकरी व कृषि विभागाच्या अधिकारी वर्गाच्या असणार्या समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतकर्यांच्या काजू बागांमध्ये भेटी दिल्या. गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी व कुमरी या गावातील कृषि सहाय्यक श्री. एन. सी. दुनगहू हे आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित होते. सदर गावांमध्ये हॉर्टसॅप योजनेअंतर्गत काजूच्या निवडलेल्या बागांना भेटी दरम्यान एकूण ३० काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
निवडलेल्या गावातील काजूच्या बागांच्या पाहणीदरम्यान बर्याच बागा या मोहोरलेल्या तसेच फलधारणा अवस्थेत व काजू बिया तयार झालेल्या अवस्थेत दिसून आल्या. शेतकर्यांना भेडसावणार्या मोहोर करपण्यासंबंधी समस्येवर उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले गेले. सदर मोहोर करपण्याचे मुख्य कारण हे या भागातील वातावरण असल्याचे दिसून आले. या भागातील वातावरणामध्ये धुक्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ज्यावेळी मोहोर करपण्याचे व त्यावर बुरशीचे प्रमाण दिसून येते. तसेच या वातावरणात रसशोषक किडींचे टी मॉस्किटो बग (ढेकण्या) व फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून आला. या सर्वेक्षण व मार्गदर्शन मोहिमेत काजू बागांची पाहणी करून शास्त्रज्ञांनी कृषि विभागाच्या अधिकारी वर्गाच्या किड व रोग सर्वेक्षण व मार्गदर्शनादरम्यान येणार्या अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच किड व रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. या भेटीदरम्यान कृषि विभागाच्या अधिकारी वर्ग व शेतकर्यांना काजू पीक संरक्षणासाठी लघु मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
गडहिंग्लज तालुक्यातील कुमरी या गावी “काजू लागवड तंत्रज्ञान व पीक संरक्षण” बुधवार दिनांक २३ मार्च, २०२२ रोजी काजू पिकाच्या शेतीशाळा व प्रक्षेत्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित काजू बागायतदार शेतकर्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत प्रकल्प अन्वेषक डॉ. विजयकुमार देसाई यांनी काजू पिकाची लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, किड- रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र दिनाचे औचित्य साधून शेतकर्यांना काजू बागेतील किड व रोगांचे निरीक्षणे कशी घ्यावीत, त्यांची लक्षणे कोणती यासंदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सदर शेतीशाळेस गडहिंग्लज तालुक्यातील श्री. एच. बी. बोंगे (मंडळ कृषि अधिकारी) यांनी नवीन आर्थिक वर्षातील कृषि विभागाच्या विविध शासकीय योजनांबाबत माहिती देऊन शेतकर्यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषि सहाय्यक श्री. एन. सी. दुनगहू यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केले. सदर शेतीशाळेस एकूण २० शेतकर्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_