मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न
🟥मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,६जुलै : मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधील मार्च २०२१-२२ या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत
गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा मंगळवारी सत्कार करण्यात आला.प्रथम क्रमांक प्राप्त प्रार्थ प्रशांत राऊळ,द्वितीय क्रमांक प्राप्त सेजल बापू शिरोडकर व तृतीय क्रमांक प्राप्त प्रणव प्रवीण गोसावी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल, श्रीफळश्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ व सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख विक्रांत सावंत यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू साहिश तळणकर याचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सावंत यांनी प्रास्ताविक केले. त्याचबरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी आपल्या भाषणामध्ये असे सांगितले की, आपली कोकणातील मुले एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेत नाहीत. या स्पर्धा परीक्षां बाबत मार्गदर्शनही मिळत नाही. विद्यार्थ्यांना या परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी महेंद्र पेडणेकर यांनी अकॅडमी सुरू केली. ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. मा.रुपेश राऊळ म्हणाले की, मळगांव प्रशाला ही जिल्ह्यातील नावाजलेली असून या प्रशाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे मुख्याध्यापिका सौ. सावंत मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी तुम्हा विद्यार्थ्यांना कोणतीही मदत हवी असल्यास आम्ही सदैव तयार असल्याचे सांगितले. महेंद्र पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये योग्य दिशा मिळावी यासाठी करिअर विषयक मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी संवाद अधिकारी घडवण्यासाठी या विशेष मोहिमेअंतर्गत मळगांव हायस्कूल मळगांव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच त्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रशाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सावंत ,पर्यवेक्षक फाले सर ,जेष्ठ शिक्षक कदम सर मोर्ये मॅडम व पत्रकार सुखदेव राऊळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विठ्ठल सावंत सर यांनी केले.यावेळी एस. एस. सी. गुणवंत विद्यार्थ्यांसहीत सद्या दहावीत शिकत असलेले विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_