कसाल बाजार पेठ येथे धुळीचे साम्राज्य
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल:१६- येेथिल कसाल मुंबई-गोवा महामार्गावर सिंडीकेट बँके नजीक गटार खोदाईचे काम सुरू असल्याने कसाल बालमवाडी या ठिकाणावरुन बाजारपेठेत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर डांबरच शिल्लक राहिले नसल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यालगत असणार्या दोन्ही बाजूंचा दुकानदार, व्यापाऱ्यांना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कुडाळच्या दिशेने कसाल बाजारपेठ प्रवेश करताना सिंडिकेट बँकेच्या नजीक रस्त्यावर गटार लाईन चे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे ठेवण्यात आले आहे तसेच या रस्त्यावर असणारे डांबर पुर्ण पणे निघून गेले आहे. महामार्गाचे रुंदीकरणासाठी काम सुरु असताना या बाजारपेठ प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील डांबर काढून टाकण्यात आले होते. तर या ठिकाणी रस्ताचा बाजूला मातीचा ढिगारा ठेवल्याने एसटी बस चालकाला गाडी वळविताना मोठी कसरत करावी लागत आहे.या ठिकाणी असलेल्या मातीचा ढिगारा काढून टाकण्यात यावेत व या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्त्यावर डांबर व खडीचे एकही थर न फिरवल्यामुळे बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे तेथे असणारी मातीची धूळ आजूबाजूच्या सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन वस्तू खराब होत आहेत. रस्त्याचे खडीकरन ,डांबरीकरन करण्यात यावे अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांकडून होत आहे.