ताठाखालच्यांच्या तोंडी हिंमतीने शब्द शोभत नाहीत:मिलिंद बोभाटे
सुरेश सावंत यांनी सांगवे सोसायटी मध्ये निवडून येऊन दाखवावे..
कुडाळ:१५ – सांगवे सोसायटीमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार होत होता हे गावातील प्रत्येकाला माहीत आहे.गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार रोखण्याला जर सुरेश सावंत गुंडगिरी म्हणत असतील तर हो जनतेच्या हितासाठी अशी गुंडगिरी याही पुढे सुरूच राहणार आहे. त्यामुळे अगोदर सुरेश सावंत यांनी सांगवे सोसायटी मध्ये निवडून येऊन दाखवावे आणि नंतरच सिंधुदुर्ग बँक निवडणूकीच्या वल्गना कराव्यात.
तूमचे कर्तृत्व सांगवेवासीयांना चागलेच माहीत आहे.काल परवा प्रयत्न पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा द्वेष करणारे सुरेश सावंत आता त्यांच्याच ताठाखाली आहेत. जर एवढीच हिंमत होती तर धान्याचा टेम्पो अडवला तिथे यायचे होते मग गुंडगिरी कशी असते ते समजले असते
मागील निवडणुकीत पंचायत समितीची उमेदवारी मिळत नव्हती तेव्हा हेच सुरेश सावंत नेत्यांना लाखोली वाहत होते. सतीश सावंत यांच्यामुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली असे हेच सुरेश सावंत सांगत होते.
चिरे,वाळूची वाहतूक करताना रॉयल्टी न भरता शासनाची फसवणूक करणाऱ्या सुरेश सावंत यांना सांगवे सोसायटीतील धान्याचा काळाबाजार दिसणारच नाही .ते धान्य सोसायटीचे नव्हते तर कोणाचे होते हे सुरेश सावंत यांनी सांगावे.लवकरच सत्य बाहेर येईल ,आमचा न्यायदेवते बरोबरच सांगवे गावच्या ग्रामदेवतेवर विश्वास आहे.त्यामुळे गोरगरिबांना लुटणाऱ्याना ,त्रास देणाऱ्याना ग्रामदेवता शासन करणार हे निश्चित आहे आणि तो दिवस दूर नाही,तुमचे घडे आता भरले आहेत.नेहमी दुसऱ्याचा द्वेष करणाऱ्या सुरेश सावंत यांनां सतीश सावंत यांचा उत्कर्ष पहावत नाही म्हणूनच ते आता एकेरीवर आले आहेत हे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी.