कसाल सर्विस रस्त्यावरील माती धोकादायक..
महामार्ग विभाग व ठेकेदार यांचे दुर्लक्ष रस्ता वाहतुकीस धोकादायक.
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल :१५ – मुंबई-गोवा महामार्गावर कसाल मालवण रस्त्यावर सिंडिकेट बँक समोरील सर्विस रोडवरील मातीचा ढिगारा गेले तीन महिने या ठिकाणी पडून आहे. याठिकाणी महामार्गाच्या सर्विस रोडच्या गटाराचे काम करण्यात आले हे गटाराचे काम करताना याठिकाणी माती काढण्यात आली मात्र गटार बांधून पूर्ण झाल्यावर माती तशीच ठेवण्यात आली. येथील ग्रामस्थांनी वारंवार महामार्ग ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधूनही कोणतीही उपाययोजना केली नसल्याने तेथील सर्विस रोड वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या सर्विस रस्त्यात वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची संभावना आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.