फोंडा येथे दत्त जयंतीनिमित्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तु वाटप
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल – सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेने दत्त जयंती निमित्त हेल्थ या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना स्टीमर ,मास, सॅनिटायझर ,वह्या इत्यादी वस्तूंचे वाटप केले हे वाटप फोंडा येथील राणे कुटुंबियांकडून करण्यात आले ८० हून अधिक दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला . साईकृपा अपंग संस्थेच्यावतीने अध्यक्ष अनिल शिंगाडे व नीलम राणे या कार्यक्रमास उपस्थित होते तर हेल्थ संस्थेच्या वतीने राणे कुटुंबातील अवधूत राणे , गीतांजली राणे, प्रसाद राणे आदी उपस्थित होते अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी सर्व दिव्यांग सदस्यांच्या वतीने राणे कुटुंबीयांचे आभार मानले.