मुंबई-गोवा महामार्गालगत भुसंपादन झालेली जमिन मोजणी करुन कमी जास्त पत्रक करावे..

▪️संपादित जमीनीचा कजापा करण्यात यावा; मनसे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांची प्रांताधिकारी यांच्या कडे मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०२: मुंबई-गोवा महामार्गालगत भुसंपादन झालेली जमिन मोजणी करुन कमी जास्त पत्रक करावे. संपादित जमीनीचा कजापा करण्यात यावा अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांनी प्रांताधिकारी यांच्या कडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ या तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील महामार्गालगत असलेल्या जमिनींचे भुसंपादन करण्यात आलेले आहे. सदर भुसंपादनाच्या मोजणीप्रमाणे मोबदला वाटपाकरीता गावनिहाय वितरणपत्र तयार करण्यात आले आहे. या विवरणपत्राप्रमाणे नमुद क्षेत्राच्या जागेचा मोबदला जमिन मालकांना देण्यात आला. मोबदला मिळुनही सातबाराला नोंद महामार्गात जमिन गेली ती न केल्याने पूर्वीप्रमाणे सातबारावर क्षेत्र दिसत असल्याने त्या संपादित जमीनीचा कजापा करण्याची गरज असुन सदर कजापा करण्यात आलेला नाही. कजापा न केल्याने प्रत्यक्ष काही भुसंपादीत शेतकर्‍यांच्या विवतरणपत्राच्या नमुद क्षेत्रापेक्षा जास्त जमिनी गेल्या आहेत. काही शेतकर्‍यांची विवतरणपत्राच्या नमुद क्षेत्रापेक्षा कमी जमिनी गेलेल्या आहेत. त्या जमिनीतील मोबदल्याचा विषय प्रलंबित राहीला आहे.

काही मिसींग प्लॉटचे मोबदला येण्याकरीता हायवेचे काम चालु असताना मोबदला येण्यास दोन ते अडीज वर्षे विलंब झाला. हायवेचे काम पूर्ण झाल्यास, कजापा न केल्यास मिळालेल्या मोबदल्यापेक्षा जास्त क्षेत्र गेल्यास, त्या शेतकर्‍यांना उर्वरित मोबदला मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्याचप्रमाणे हायवेलगतच्या जमिनी खरेदी विक्री करताना मुळ सातबारातील महामार्गासाठी संपादीत क्षेत्र वगळले नसल्याने सातबारा मुळक्षेत्राएवढाच आहे. सदर जमिन खरेदी, विक्री करताना खरेदीदाराची फसगत होऊ शकते. त्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण होऊन हस्तांतर होण्यापुर्वी सदर संपादीत जमिनीचा कजापा निवृत्त भुमिसर्वेक्षक (सर्व्हेअर) यांच्या माध्यमातुन शासनाने ठेकेदाराकडुन मोबदला घेऊन लवकरात लवकर संपादित जमिनीची मोजणी करुन कजापाप्रमाणे सातबारावर नोंद करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!