भव्य मिरवणुकीने श्री दुर्गामातेचे आगमन; ओंकार मित्रमंडळाचा नवरात्रोत्सव उत्साहात
ढोल-ताशांचा गजर आणि ‘दुर्गा माता की जय’च्या जयघोषाने सावंतवाडी परिसर दुमदुमला
सावंतवाडी, ता. ९ : येथील ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. भटवाडी येथील श्री दुर्गामातेचे आगमन वाजतगाजत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाले. ढोल-ताशांचा निनाद, भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ‘दुर्गा माता की जय’च्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष भरत परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दिलीप भालेकर, शिवम सावंत, रघुनाथ धाराणकर, भागर्व धाराणकर, राजा ढळवी, प्रसाद परब, दीपक सावंत, प्रदीप भालेकर, रमेश परब, चंदन नाईक, कुणाल शिंगारे, विजय सावंत, गौरव रामाने, स्वप्निल कमते, तानाजी पाटील, जय भालेकर, दत्तगुरू मोर्ये, संतोष खंदारे, सुनील जाधव आणि अभय खंदारे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंडळातर्फे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात भाविकांनी सहभागी होऊन श्री दुर्गामातेचे दर्शन घ्यावे आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

