Uncategorized

आरोंदा येथे वनराई व जलतारा बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आरोंदा येथे वनराई तसेच जलतारा बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत भटपावणी येथे दोन वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. आतापर्यंत आरोंदा परिसरात एकूण चार वनराई बंधारे पूर्ण झाले असून, एका जलतारा बंधाऱ्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून या बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे जलसंधारणाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

भटपावणी येथे बंधारे बांधण्याच्या वेळी आबा केरकर, शिवाजी नाईक, ग्रामपंचायत अधिकारी सतीश राणे, ग्रामपंचायत कर्मचारी अजित मयेकर, महादेव नाईक, पुनाजी जाधव, सुनील जाधव, दीपक जाधव, परिद्धी साळगावकर व संगणक परिचर मधुरा मुळीक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!