कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात पक्षकारांना त्रास दिला जातोय; मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री
▪️प्रलंबिक प्रकरणे मार्गी न लावल्यास कार्यालयाची तोडफोड करणार असल्याचा मेस्त्री यांचा इशारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०४: भूमिअभिलेख कार्यालयात आलेल्या पक्षकारांना त्रास दिला जात आहे. अनेक महिने कामे रखडवून पैशाची मागणी केली जात आहे. या कार्यालयातून मोजणी, कजाप यासारखी प्रकरणे गहाळ केली जात आहेत. या कार्यालयात रखडलेली नागरिकांची कामे त्यात कजाप, मोजणी, नकाशा यासह अन्य प्रलंबिक प्रकरणे महिन्याभरात मार्गी लावा अन्यथा ५ जानेवारीला मनसे स्टाईलने कार्यालयाची तोडफोड केली जाईल, असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी भूमिअभिलेख प्रभारी उपअधिक्षक प्रकाश भिसे यांना दिला. त्यावर भिसे यांनी महिन्याभरात प्रकरणे मार्गी लागण्याचे आश्वासन दिले आहे. कणकवली भूमिअभिलेख कार्यालयाच्या समस्य़ांबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी घेराव घातला. यावेळी मनसे शहरअध्यक्ष शरद सावंत, निखिल आचरेकर, भुषण ठाकूर, संतोष सावंत, आदींसह मनसे कार्यकर्ते व विविध कामे रखडलेले पक्षकार उपस्थित होते.
कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन प्रक्रियेतील कमी जास्त पत्रक का होत नाहीत.कणकवली प्रांताधिका-यांनी लेखी पत्र देवून सुद्धा दुर्लक्ष का करता? त्यात तुम्हाला पैसे हवेत का? न्यायलयाच्या आदेशानुसार नोजणी काम का रखडले? नागरिकांना नकाशा नक्कल देण्यासाठी पैसे का घेतले जातात? आकारफोड करताना पक्षकारांना रखडवून का ठेवले जाते? यासह मनसेच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारत भूमिअभिलेख उपअधिक्षक भिसे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. त्यानंतर भिसे यांनी आपण पुढील महिन्याभरात कणकवली शहरातील कमी जास्त पत्रके मार्गी लावू, तसेच ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्याबाबत आपण सर्व कर्मचा-यांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावले जातील पक्षकारांकडे आम्ही पैसे मागत नाही अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला त्यावर संतप्त झालेला दया मेस्त्री व मनसे कार्यकर्त्यांनी खोटं बोलाल तर याद राखा. पुराव्यासहित माणसे उभी करु, नागरिकांना त्रास दिल्यास मनसे सैनिक सहन करणार नसल्याचा इशारा दया मेस्त्री यांनी दिला. यावेळी भिसे यांनी महिन्याभरात प्रलंबित कामे मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यानंतर घेराव आंदोलन थांबवण्यात आले.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

