चिपळूणच्या माहेरवासींनी उपायुक्त नयन ससाणे यांनी स्वच्छता मोहिमेत बजावली महत्वपूर्ण भूमिका
ससाणे यांनी राबवली नियोजनबद्ध यशस्वी मोहीम
चिपळूण दि.१२ ऑगस्ट (ओंकार रेळेकर) महापुरात चिपळूण शहरात झालेल्या चिखल व कचऱ्या पासून शहरवासीयांची मुक्तता करण्यासाठी खास मुंबई ,नवी मुंबई, ठाणे येथून आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास खात्याने पथक पाठवले होते या पथका पैकी वसई विरार महानगरपालिकेच्या उपायुक्त व पूर्वाश्रमीच्या चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी नयन ससाणे यांनी स्वच्छता मोहिमेत अतिशय नियोजन बद्ध उपाय योजना राबवून शहर वासीयांची घाणीच्या साम्राज्यापासून मुक्तता केली. पुन्हा एकदा चिपळूण च्या माहेरवासिनीने आपल्या कामाची झळक चिपळूण वासीयांना दाखवून दिली आहे.
स्वछता दूत म्हणून मदतीला धावून आलेल्या ससाणे यांच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकारी वर्गाने आणि चिपळूण मधील व्यापारी आणि नागरीकांनी विशेष कौतुक केले आहे.चिपळूण मध्ये मी
मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे चिपळूण ला मी माझे माहेर समजते त्यामुळे महापुराचे दृश्य पाहिल्या नंतर मन हेलावून गेले आणि येथेच काम करण्यास पाठवण्याची विनंती मी आमचे आयुक्त डी. गंगाथरन यांना केली २००९ मधील चिपळूण च्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि वसई विरार महानगर पालिकेच्या उपायुक्त नयन ससाणे यांनी येथे बोलताना दिली.ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे आणि वसईच्या उपायुक्त नयन ससाणे शहरवासीयांकरिता स्वच्छता दूत ठरल्या
आहेत.त्यांच्या माध्यमातून पूरग्रस्त चिपळूण स्वच्छ करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आणि चिपळूण शहर अवघ्या नऊ दिवसांत स्वच्छ झाले. रात्रंदिवस काम करून चिपळुणातील कचरा आणि आलेला गाळ साफ करण्यात यश मिळाले. यामुळे साथरोग प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला आहे.२२ जुलै रोजी आलेल्या महापुराने चिपळूणला उद्ध्वस्त केले.शहरालगतची बारा गावे आणि शहर महापुराने पूर्णत: बरबाद झाले. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर चिपळूण शहर परिसरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आणि यानंतर चक्रे फिरली.
या बाबत वसई विरार महानगर पालिकेच्या उपायुक्त
नयन ससाणे यांनी सांगितले की, खरंतर माझी महाड येथील पूरग्रस्त भागात काम करण्यासाठी आमचे आयुक्त डी. गंगाथरण यांनी नेमणूक केली होती परंतु मी पूर्वी चिपळूण मध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केले होते याचा मला चांगला अनुभव होता शहरातील सर्व रस्ते विविध प्रभाग मला माहित होते यामुळेच मी आयुक्त यांच्याकडे चिपळूणला कामगिरीसाठी मला नेमावी अशी मागणी केली होती. ना. एकनाथ शिंदे यांनी चिपळूणचा दौरा केल्यानंतर तत्काळ आम्हाला चिपळूणची अवस्था अधिक भीषण आहे सर्व टीमसह चिपळुणात दाखल व्हा असे आदेश दिले आणि आम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि वसई महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी सर्व यंत्रणेसह चिपळुणात दाखल झालो आणि येथील यंत्रणा आम्ही ताब्यात घेतली. प्राथमिक स्तरावर सर्व शहराची पाहणी केली.शहर स्वच्छता करण्याचे मिशन कसे राबवायचे यावर नियोजन झाले, स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्षा,कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर बैठका घेऊन माहिती घेण्यात आली. शहराचे कर्मचाऱ्यांना रात्रपाळीचे काम देत पंधरा विभाग करण्यात आले.
रस्त्यावरील गाळ काढणे हे आम्हाला आव्हान होते. परंतु संपूर्ण यंत्रणा नियोजन बद्ध कामाला लावून दहा दिवसांत सर्व कामावर आघाडी घेतली असे सांगून त्यासाठी अद्ययावत यंत्रणा मागविण्यात आली होती असे ससाणे यांनी सांगितले.कचरा उचलणे, गाळ काढणे या बरोबरच काही व्यापाऱ्यांनी भिजलेल्या मालाचे उचललेल्या कचऱ्याची विल्हेवाट,सेल
लावले. तसेच वाहतूक कोंडी झाली फवारणी, पाणी शुद्धीकरण, औषध वाटप,यामुळे स्वच्छता अभियानात अडथळा सेफ्टी टँक साफ करणे, वाहतूक व्यवस्था निर्माण झाला. अखेर दिवस-रात्र काम अशा अनेक आघाड्यांवर काम करण्याचे करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती आयुक्त नयन ससाणे यांनी दिली.
चिपळूण शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने गेली नऊ दिवस अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आयुक्त नयन ससाणे यांनी आलेल्या अनुभवाबद्दल बोलतांना पुढे सांगितले की आम्ही सुरुवातीला डीपी प्लॅन समोर घेऊन त्यानुसार स्वच्छतेची मोहीम हाती घेतली त्यासाठी याची सुरुवात अत्यंत दलदल चिखल असलेल्या भागापासून म्हणजेच पेठमाप येथुन केली मुंबई महापालिका टाऊन प्लॅनिंग विभागाचे भार्गव गायकवाड यांच्याकडून नियोजन बद्ध आराखडा बनवुन घेतला डंपर किती लागतील मशिनरी काय लागतील याचा सर्वे करून थेट प्रत्यक्ष स्वच्छतेला सुरवात झाली मनपाचे अधिकारी संदीप दळवी ,सुनील पानस्कर,ज्ञानेश्वर कदम,नवी मुंबईचे प्रशासकीय अधिकारी महेंद्र सप्रे यांना सोबत घेऊन पेठमाप बौध्दवाडी,परीट आळी, तांबट आळी येथे प्रत्यक्ष मशिनरी घेऊन कामाला सुरुवात झाली ढोपरभर चिखलात पायी चालत जाऊन चिखल साफ करण्याची मोहीम सुरू झाली काही काळ किती काही केले तरी चिखल आणि दलदल कमी होत नव्हती अशा वेळी आमच्या समोर हे मोठे आवाहन निर्माण झाले होते. मुंबई,नवी मुंबई,ठाणे,
नालासोपारा,चिपळूण नगरपालिका कर्मचाऱ्यांसह चिपळूण, खेड राजापूर, इतर स्वयंसेवी संस्था डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्री क्षेत्र नाणीज, सत्संग रामदास्वामी ट्रस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते मिळून एकूण १४ हजार पेक्षा अधिक लोक स्वच्छता कामात झोकून काम करीत होते.यातून सुमारे ३० हजार टन कचरा उचलण्यात आला या करिता ४४ डंपर, २० जेसीबी,१४ टॅक्टर, ८ हायवा, १३ पाण्याचे टँकर ५ सक्शन, ६ अग्निशामक दिवसाच्या वेळी वापरण्यात येत होते तर रात्रीच्या वेळेत ७ जेसीबी,१२डंपर , १ टॅक्टर, ३ हायवा, २ बॉबकॅट ,२कैची जेसीबी, २ धूर फवारणी यंत्र,२ मेल सफाई मशीन,९ हॅन्ड फवारणी मशीन यंत्रइत्यादी यंत्रणा वापरण्यात आल्याची माहिती उपायुक्त नयन ससाने यांनी दिली. यामध्ये राजापूर ,खेड, दापोली, ठाणे ,नवी मुंबई, मुंबई येथून पाण्याचे टँकर मागविण्यात आले होते.या कामी पेठमाप विभाग परिसर मिळून १४७० कर्मचारी येथे काम करीत होते.
चौकट : *सफाई कामगारांसाठी नयन ससाणे बनल्या देवदूत*
आपला जीव धोक्यात घालून चिखलात हात घालून स्वच्छतेचे महत्त्वपूर्ण काम करणारे स्वच्छता कामगार यांना सेफ्टी किट नव्हते अशा वेळी ससाणे यांनी मुंबई येथील लायन्स क्लब यांच्याशी संपर्क करून सफाई कामगारांकरिता करता सेफ्टी किट देण्याची विनंती केली लायन्स क्लबचे ऋषी सक्सेना यांनी तात्काळ विनंतीचा मान ठेवून १३५ सफाई कामगार व २५० पाणीपुरवठा कामगार यांना गमबूट ,हॅन्ड ग्लोज, कचऱ्याचा फावडा इत्यादी साधन सामुग्री उपलब्ध करून दिली.या नियोजना बद्दल सफाई कामगारांनी नयन ससाणे आपल्यासाठी जणू देवदूत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
चिपळुणात मदत कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल मोठ्या प्रमाणात आल्या होत्या या प्लास्टिक बाटल्या पुढे मोठा पाऊस आल्यानंतर पुन्हा पूर भरण्यासाठी धोकादायक ठरू शकले असत्या या गोष्टीचा ससाणे यांनी गांभीर्याने विचार करून तात्काळ प्लास्टिक गोळा करणारी टीमला बोलावून घेतले यामध्ये सुमारे ३० टन प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकलिंग करता गोळा करण्यात आल्या हे महत्त्वपूर्ण काम पुणे येथील वाल्मी संस्था ,निसर्गाच्या पाऊलखुणा, गड किल्ले संवर्धन समिती तसेच मुंबई येथील अलर्टस सिटीझन फोरम खुषी टीम यांनी केले या मध्ये एकशे दहा महिलांची टीम शहरात फिरून प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल गोळा करत होत्या एकूण ५६ रॅक भरून बाटल्या गोळा झाल्या .घरात लहान मुले एकटी आहेत,शिवाय स्वतःची तब्बेत ठीक नसतांनाही नयन ससाणे यांनी सतत नऊ दिवस चिपळूण वासीयांची अहोरात्र सेवा केली या बद्दल राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना .उदय सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी ससाने यांचे रविवारी विशेष कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.