कोकणसिंधुदुर्ग

पंतप्रधान किसान योजनेचा होतोय दुरुपयोग;ह्याबाबत सखोल चौकशी व्हावी

 

सागर नाणोसकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग, दि.१२:-पीएम किसान योजना या शासनाच्या योजनेचा दुरुपयोग होत आहे,गावा गावातील पीएम किसान पोर्टलवर गावात नसलेल्या शेतकर्यांची नावे दिसत आहेत असा आरोप युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर यांनी केला आहे. याची अधिकृत सखोल चौकशी व्हावी यासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांनी निवेदना द्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग लक्ष वेधण्यात आले आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावामध्ये किसान पोर्टलवर गावाचे नाव समाविष्ट केल्यावर रहिवाशी नसलेल्या लोकांची नावे समाविष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ह्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवासेना सावंतवाडी तालुका अधिकारी योगेश नाईक, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना कुडाळ तालुका अधिकारी योगेश धुरी, युवासेना शहर अधिकारी संदिप महाडेश्वर, युवासेना उपतालुकाअधिकारी रोहित पडवळ, युवासेना उपतालुकाअधिकारी सोनु गवस आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!