कोकणराजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिड हजार रोपाचे होणार वृक्षारोपण

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या मार्गदशनाखाली दीड हजाराहुन अधिक रोपांची लागवड करणार -पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम

चिपळूण २० जुलै (संतोष पिलके) : – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज (22 जुलै) रोजी वाढदिवस असून या दिवशी चिपळूण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने तालुक्यात हजारो रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
कोरोना वर मात करण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या रोपांची लागवड होणे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे . वृक्षा कडून मिळणार्‍या ऑक्सिजन मुळे भविष्यात कोरोनावर मात करता येईल याचाच विचार करता, मा.नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दीड हजारहून अधिक रोपांची लागवड तालुक्यात करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ शहरातील बायपास रोड वरील पाण्याच्या टाकी पासून करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम,पर्यावरण प्रेमी शौकत भाई मुकादम ,तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दादासाहेब साळवी, शहराध्यक्ष मिलिंद कापडी ,महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई चव्हाण ,महिला तालुकाध्यक्ष जागृती ताई शिंदे, महिला शहराध्यक्ष दिपीकाताई कोतवडेकर, व सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य , नगरसेवक ,अल्पसंख्याक, युवक , युवती , विद्यार्थी संघटनेचे सर्व कार्यकर्ते ,आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!