अन्यथा ‘श्राद्ध’ आंदोलन करू; शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांचा एस.टी. महामंडळाला निर्वाणीचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०९: येथील मध्यवर्ती एस.टी. स्थानकाचे काम गेले कित्येकवर्षं ठप्प आहे. एस.टी. अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून काम सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांची कुचंबणा आता सहन होत नाही. येत्या २० दिवसात हे काम सुरू करा अन्यथा स्थानकाच्या परिसरात अधिकारी आणि ठेकेदाराचे सर्वांसमक्ष श्राद्ध घालून आंदोलन सुरू करू असा निर्वाणीचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिला आहे. विभाग नियंत्रक रत्नागिरी यांना तसे लेखी पत्रच त्यांनी सादर केले आहे.
चिपळूण भोगाळे येथील एसटी स्थानकाचे संपूर्ण पुनर्रउभारणीचे काम मुंबई येथील स्कायलार्क या ठेकेदार कंपनीकडे देण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने हे स्थानक उभारले जाणार असून त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.काम सुरू करण्यासाठी स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. परंतु पुढील काम ठप्प पडले आहे. गेले कित्येक वर्षे काम बंद असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
या बाबत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत तसेच कापसाळ विभागप्रमुख राम डिगे, मालदोली विभागप्रमुख नितिन निकम, युवासेना उपतालुका अधिकारी संजय चांदे शाखाप्रमुख संतोष रहाटे यांनी ९ सप्टेंबर रोजी चिपळूण आगार प्रमुखांची भेट घेऊन या संदर्भात माहिती घेतली असता समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.असा आरोप सावंत यांनी करून आता थेट विभाग नियंत्रक रत्नागिरी यांना लेखी पत्र पाठवून संताप व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात ती जागा एस.टी. महामंडळाची असून त्याच्यावर होणारे बांधकाम हे एसटी महामंडळ विभागाच्या आणि अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालीच येते.त्यामुळे त्याला संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत. परंतु अधिकारी कोणतीच जबाबदारी न घेता ठेकेदारवर ढकलून देत आहेत.असेही सावंत यांनी नमूद केले आहे.
येत्या २० दिवसात जर स्थानकाचे काम पुन्हा सुरू झाले नाही तर स्थानक परिसरात शिवसैनिक आणि प्रवाशांना बरोबर घेऊन अधिकारी आणि ठेकेदाराचे श्राद्ध घालू आणि तीव्र असे आंदोलन सुरू करू त्यावेळी जे परिणाम होतील त्याला एसटीचे अधिकारी आणि ठेकेदार हेच जबाबदार असतील असा इशारा संदीप सावंत यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

