वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांचा शिवसेना तालुका वैभववाडीच्या वतीने सत्कार

 

 

लोकाभिमुख कारभार करणारे तसेच सलग दोन वर्षे वैभववाडी तालुक्याच्या मानाच्या शिरपेचात तुरा रोवणावरे तहसीलदार रामदास झळके साहेब यांना महसूल दिनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या काळात दिवस रात्र काम करून सर्व सामान्य जनतेशी संलग्न राहुन कोविड काळात यशस्वीपणे नियोजन केले. प्रशासनाला व तालुक्यातील सर्व पक्षिय पदाधिकाऱ्यांमध्ये, लोकप्रतिनिधीमध्ये यशस्वी समन्वय साधून तालुक्यात लोकाभिमुख प्रशासन कसे चालवावे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तहसीलदार झळके साहेब. सामान्य जनतेशी थेट संबंध असणारे झळके साहेब यांना हा सन्मान मिळाल्या बद्दल वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने व तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष सावंत, माजी सरपंच नावळे संभाजी रावराणे, खांबाळे उपसरपंच गणेश पवार, सडूरे माजी सरपंच विजय रावराणे, सामाजिक कार्यकर्ते डी.के.सुतार, नापणे शाखाप्रमुख संतोष पाटील, दीपक पवार, शासकीय ठेकेदार सुनिल रावराणे आदी पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!