गांजा विक्री रँकेट मधील मुख्य सुत्रधार स्वतः पोलीस ठाण्यात झाला दाखल;अनेकांचे धाबे दणाणले

सावंतवाडी :  गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असून, गेल्या दोन दिवसात स्थानिक गुन्हा विभागाच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र यातील मुख्य सुत्रधार बॉबी उर्फ फैजल बेग हा फरार होता. तो रविवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्याने गांजा प्रकरणातील चौथी अटक करण्यात झाली असून, या संशयिताकडून अनेक ग्राहकांची तसेच एंजटाची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस त्या पद्धतीने शोध घेत आहेत
जिल्हयात गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अनेक दिवसापासून होता. त्या दृष्टीने पोलीस शोध घेत होते. त्यातच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आकेरी जवळ सावंतवाडीतील दोघां युवकांना ताब्यात घेतले यात मयुरेश कांडरकर व आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता. या दोन्ही आरोपीना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
अतुल उमेश गवस या युवकांला ताब्यात घेतले त्याचा जबाबात सावंतवाडी येथील आणखी एका युवकांचे नाव समोर आले आणि तो यातील मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांना समजले म्हणून पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा सावंतवाडी येथील एका बंद घरात धाड टाकली हे घर बॉबी उर्फ फैजल बेग यांचे असल्याचे चौकशीत पुढे आले. त्याच्या घरात तब्बल ३ किलो गांजा आढळून आला होता. मात्र पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच तो फरार झाला होता. पोलीस त्यांचा शोध घेत होते.
त्यातच रविवारी सांयकाळी बॉबी हा स्वत:हून कुडाळ पात तपास अधिकारी सागर भोसले यांच्या समोर हजर झाला असून, पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत. त्याचा अद्याप मोबाईल हस्तगत करण्यात आला नव्हता. कारण तो गांजा आणत होता.
कुणाला देत होता तसेच यात कोण कोण दलाली ककरीत होते. त्यानंतर ग्राहक कोण होते या सर्वांचा शोध पोलीस घेणार असून पोलिसांनी या गुन्ह्यात चांगलाच फास आवळतच आरोपी स्वताहून हजर झाल्याने पोलिसांनी ही सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच मुख्य सुत्रधारच ताब्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
सावंतवाडीतील एंजट तसेच ग्राहक भूमिगत सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात गांजा येतो तसेच येथे ग्राहक ही मोठ्या प्रमाणात असल्याने आता आपली नावे या गन्हयात येतील या भितीने यातील एंजट चांगलेच धास्तावले असून,ग्राहक ही घाबरले आहेत. आपली नावे यात आली तर करिअर धोक्यात येतील या भितीने अनेक जण भुमिगत झाले आहेत. मात्र या गुन्ह्याचा सखोल तपास करणार असल्याचे तपास अधिकारी सागर भोसले यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!