कलंबिस्तमध्ये श्नमदानातून वाहतूकीस उभा केला पूल
सावंतवाडी प्रतिनिधी गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी पूर स्थितीमुळे अनेक भागात नदी वरील पूल तुटून गेले त्यामुळे अनेक वाद या गावांचा संपर्क तुटला आहे अशीच परिस्थिती कलंबिस्त धामणा मळा भागात तेरेखोल नदी पात्रा वरील पुल तुटल्याने या भागातील जवळपास चार कुटुंबे जवळपास 30 हून अधिक शेतकऱ्यांचे संपर्क तुटला आहे त्यामुळे तुटलेल्या पुल ची दुरुस्ती स्वतः या गावातील तरुणांनी एकत्र येत हाती घेतली आहे आज रविवारी जवळपास वीस ते पंचवीस तरुण एकत्र येत हा मार्ग खुला करण्याचे काम हाती घेतले होते गाव करील ते राव करील काय या उक्तीप्रमाणे शासकीय प्रशासनाची वाट न पाहता श्रमदानाने लोखंडी पूल व पत्रा टाकून हे पूल वाहतुकीस येण्या-जाण्याचा खुले केले आहेउपास्थित प्रल्हाद तावडे, कमलाकर सावंत. दीपक सावंत, शैलेश सावंत, सिद्धू सावंत, सिद्धेश सावंत नितेश सावंत, शेखर मेस्त्री, राजेश सावंत, आलेक्स रोड्रिक्स, जीवन सावंत, सुशांत पवार, सुशांत सावंत, स्वप्नील सावंत, उल्हास सावंत, शामू राऊळ, नादकिशोर राऊळ, मयूर वारंग आनंद बिडये अनिल सावंत विलास तावडे पांडुरंग पांडुरंग राऊळ रमेश सावंत असे ग्रामस्थ यात सहभागी झाले होते या पुलाची पाहणी बांधकामचे अधिकारी अनिल आवटे श्री परांजपे यांनी केली या पूल साकवा बाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले

