सावंतवाडी करांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकीची आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज..
🟥सावंतवाडी करांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकीची आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज..
🟥माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदत घेत केले जर्सी चे अनावरण
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,८जुन: सावंतवाडी शहरामध्ये सामाजिक बांधिलकी आपत्कालीन व्यवस्थापन टीमची स्थापना करण्यात आली आहे.सामाजिक बांधिलकीच्या अध्यक्षपदी रवी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक बांधिलकी संघटनेने यापूर्वी रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक शैक्षणिक, कोरोना काळात मदत मिळवून देणे, मदत करणे, रमाई घरकुल योजनेच्या वतीने सुमारे १७ पेक्षा जास्त घरकुले रवी जाधव यांच्या प्रयत्नातून या भागांमध्ये उभी राहिली आहेत. तसेच रुग्नसेवा, रुग्णांना शासकीय वैद्यकीय मदत मिळवून देणे तात्काळ रुग्णांना मदत पोचविणे, केशवसुत कविसंमेलन यासारखे साहित्य क्षेत्रामध्ये काम करणे अशा अनेक प्रकारची कामे गेल्या दोन वर्षांमध्ये रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली असल्याचे बबन साळगावकर यांनी सांगितल.
त्यांच्याच संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी आपत्कालीन मदत कार्य टीमची स्थापना होत असून याचं सावंतवाडी शहर कार्यक्षेत्र व जवळचे लगतचे गावामध्ये आपत्कालीन तात्काळ मनुष्यबळ मदत कार्य करण्यात येणार आहे. याची घोषणा बबन साळगावकर यांनी केली.
यासाठी १५ सदस्यांची टीम तयार करण्यात आली असून, यांच्या मार्फत मदत कार्य सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये शासनाच्या संबंधित खात्यामध्ये संपर्क करणे, उदाहरणार्थ तहसीलदार, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन, वीज वितरण कार्यालय यांच्याशी संपर्क करून आपत्कालीन माहिती देणे इत्यादी. यासाठी माजी नगरसेवक सुरेश भगटे, विलास जाधव, उमेश कोरगावकर, संजय पेडणेकर माजी नगरसेवकांची नगरसेवकांची टीम शासकीय संपर्क करून मदत कार्यासाठी चालना देतील प्रत्यक्ष काही ठिकाणी स्वतः मार्गदर्शन करणार आहे.
या टीममध्ये उमेश खटावकर, प्रदीप नाईक, अरुण घाडी, हर्षल बेग, संतोष तळवणेकर, लक्ष्मण कदम, नासिर पटेल, बंड्या तोरस्कर, निलेश पाटील, बंटी माटेकर, दिलीप पवार, कृष्णा लाखे, दीपक सावंत, कल्याण कदम, मनोज घाटकर, किरण वाडकर, शुभम मलकाचे हे या टीम मध्ये काम करणार आहेत.
यामध्ये ज्येष्ठ सल्लागार म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पत्रकार सीताराम गावडे, उमेश कोरगावकर, विलास जाधव, सुरेश भोगटे, संजय पेडणेकर हे काम पाहणार आहेत.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_