कसाल येथे कोविड 19 लसीकरण मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल : दि. १४ इतर व्हायरसपेक्षा कोरोना व्हायरस वेगळा आहे. Covid-19 ची लस कोणत्या कारणासाठी घ्यावी लस घेतली नाही तर काय परिणाम होईल कोरोनाच्या दोन डोस मध्ये किमान १४ दिवसाचे अंतर असणे अपेक्षित आहे. हृदयविकार , किडनी ,दमा ,डायबेडिस सर्व नागरिकांनी कोविड ची लस घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर लस घेणार याची प्रतिकारशक्ती वाढते. ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि लवकरात लवकर घ्यावी. जगात १०० देशांना भारत कोविड ची लस पुरवत आहे.
रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व कोलते हॉस्पिटल आयोजित covid-19 लसीकरण मार्गदर्शन कार्यशाळा कोलते हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर संदेश कांबळे बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ प्रशांत कोलते यांनी रोटरी क्लब ची निर्मिती कशी झाली रोटरी क्लब कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवते कोणकोणत्या विषयांवर आतापर्यंत शिबिरे घेतली आहेत याविषयी माहिती दिली.
६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासंदर्भात डॉक्टरांचे प्रमाणपत्र रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व कोलते हॉस्पिटल तर्फे मोफत देण्यात येणार आहे असे डॉक्टर प्रशांत कोलते यांनी सांगितले . कोरोनाचे काळात काम करणार्या पत्रकारांचा यावेळी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी डॉक्टर संदेश कांबळे डॉक्टर प्रशांत कोलते कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर श्रेया निगुडकर ओरोस सरपंच प्रीती देसाई उदय जांभवडेकर डॉ निगुडकर आदीसह रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्गाचे सदस्य कसाल मधील डॉक्टर पत्रकार , नागरिक उपस्थित होते . शासनाचे कोरानाचे सर्व नियमांचे पालन करत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते उदय जांभवडेकर यांनी सर्वाचे आभार मानले.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला