◾ पोलीस खात्याला चांगल्या सुविधा देण्याची पोलीस बॉईज संघटनेची गृहमंत्र्यांकडे मागणी..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-१४:- गृहमंत्री अनिल देशमुख यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने भेट घेऊन पोलीस खात्याला चांगल्या सुविधा देण्या संदर्भात विंनती करण्यात आली. यासंदर्भातले निवेदन त्यांना देण्यात येऊन पोलीस खात्यात असणारी सद्यस्थिती आणि आवश्यक सुविधा यबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकारण समन्वय समिती सदस्य राहुल अर्जुनराव दुबाले सोबत रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे, राज्य सचिव योगेश कदम, मुंबई अध्यक्ष सिद्धांत बागुल, आतिफ गोठे आदी उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस बॉईज संघटना करत असलेल्या कार्याची प्रशंशा गृहमंत्र्यांनी केली.

