आणखीआपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

रेल्वेची धडक बसल्यामुळे नेमळे येथील तरुण जागीच ठार

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. १४ रेल्वेची धडक बसल्यामुळे नेमळे येथील तरुण जागीच ठार झाला.ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास येथे घडली. सूर्यकांत गोपाळ राऊळ (वय ४७)असे त्याचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती तपासी अंमलदार शरद लोहकरे यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, परिसरात राऊळ याचे घर आहे. काल रात्री उशिरा ते रेल्वेला आदळल्याची माहिती मिळाली. त्यांना फोनवर रेल्वे ट्रॅकवर बोलत जायची सवय होती. नेहमी प्रमाणे ते बोलत जात असताना त्यावेळी आलेल्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे त्यांची धडक बसली असावी, असा अंदाज लोहकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले . याबाबतची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर,लोहकरे व एक.एस.बिलपे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते शेती करुन आपला उदरनिर्वाह करतोय त्यांच्या अशा अचानक अपघाती जाण्यामुळे नेमळे गावावर शोककळा पसरली आहे.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!