कुर्ली येथे शिवमहोत्सव संपन्न
वैभववाडी प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.त्यांनी हुशारी व संयम या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी स्वराज्य निर्माण केले,असे प्रतिपादन मराठा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाचे समन्वयक ऍड. सुहास सावंत यांनी केले.
कुर्ली केंद्र शाळा नं १ येथे कुर्ली शिवमोहत्सव २०२१ च्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ब्राम्हणेश्वर शैक्षणिक,सांस्कृतिक, उन्नती मंडळाचे अध्यक्ष नामदेव मराठे,वैभववाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबाजी हुंबे,मंडळ अधिकारी दिलीप पाटील,कुर्ली सरपंच दर्शना पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील,नवीन कुर्ली फोंडाघाट मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते,शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष चित्रांगणी पवार,प्रिया पडवळ,अभिषेक टायशेटे,मुख्याध्यापक पारधी,सुंदर देवळी, आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे सावंत म्हणाले,महाराजांनी शेतकरी मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्यामध्ये अठरापगड जातीं-धर्माचे लोक होते.त्यांनी जाती धर्माचा स्वराज्यात कधीच भेदभाव केला नव्हता. अफजलखान, शाईस्तेखान हे पराक्रमी होते परंतु त्यांच्याकडे संयम आणि हुशारी त्यांच्याकडे नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञाननिष्ठ राजे होते. त्यांनी गडाची पायाभरणी करताना कधी पंचांग अथवा मुहूर्त पाहिला नाही. ज्या अमावास्येला आपण निषिद्ध मानतो त्याचवेळी त्यांनी अनेक स्वाऱ्या करून विजय मिळविला असल्याची उदाहरणे आहेत.
शिवरायांचे शेतीविषयक धोरण हे जनताभिमुख होते. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असा त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता. छात्रपतींना समजण्यासाठी शिवचरीत्र समजून घेणे गरजेचे आहे.या वेळी शिवसन्मान पुरस्कार, शिवाजी महाराज यांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, स्मार्ट कुर्लीकर या स्पर्धेतील प्रथम,द्वितीय, तृतिय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.नामदेव मराठे,अंबाजी हुंबे,दिलीप पाटील ,सूर्यकांत पाटील,मनिषा पाटील,नम्रता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रतीक पडवळ, दिव्या पाटील, राजेश माने, किशोर सकपाळ, राकेश राणे, रुपेश पवार, कृष्णा कदम, संदीप चव्हाण, सुधीर कदम, योगेश सकपाळ यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
सुत्रसंचालन शिक्षक अमर पाटील यांनी केले.