Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमनोरंजनवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

बालनाट्य पुरस्कार प्राप्त रमेश वारंग यांच्या डान्स, ड्रामा व कथ्थक अकादमीचा शुभारंभ आज १९ फेब्रुवारी रोजी

 

सायं. ५ वा. कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयातील सिद्धिविनायक सभागृहात होणार संपन्न.

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :संजय शेळके*

*🎴वैभववाडी :* मालवणी भैय्या या नावाने सोशल मीडियात व गावागावात लोकप्रिय झालेले बालनाट्य पुरस्कार प्राप्त रमेश वारंग यांच्या डान्स, ड्रामा व कथ्थक अकादमीचा शुभारंभ शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयातील सिद्धिविनायक सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैभववाडी पो. नि. अतुल जाधव, उपनिरीक्षक प्रविण देसाई यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच नाट्य, चित्रपट दिग्दर्शक दीपक कदम, गाव गाता गजाली फेम किशोर रावराणे, चला हवा येऊ द्या फेम नितीन बोधारे कास्टिंग डिरेक्टर राजेंद्र सावंत, गायक सुधीन तांबे, नृत्य विशारद सायली करुळकर आदी लोकप्रिय कलाकार उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील मुलांना सिने-नाट्य क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा मार्ग अधिक सुकर व्हावा या हेतूने रमेश वारंग यांनी वैभववाडी तालुक्यात अकादमी ही संकल्पना हाती घेतली आहे. कोरोनाच्या दहा महिन्याच्या काळात वारंग यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जनजागृती व समाज प्रबोधन केले होते. एक चावट मधुचंद्र, अभी तो हम जवान है, सनी तूच माझ्या मनी या नाटकातून त्यांनी रसिकांची मने जिंकली आहेत. रमेश वारंग हे तालुक्यातील करुळ गावचे सुपुत्र आहेत. वैभववाडी तालुक्यात पहिली डान्स अकादमी ते सुरू करत आहेत. या अकादमीत प्रवेश घेणाऱ्या कलाकारांनी 7718082393, 9327646237, या नंबर वरती संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला रसिक प्रेक्षकांनी व बाल कलाकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन रमेश वारंग यांनी केले आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!