पाईपलाईनच्या काम सुरु असताना क्रेन कोसळली नदीत

 

प्रतिनिधी:शैलेश गवस

बांदा तेरेखोल नदीवर मणेरी ते वेंगुर्ला पाईपलाईनचे काम करत असताना क्रेनला अपघात होऊन नदीत कोसळली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर अपघात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाला. आज दुपारी क्रेनच्या सहाय्याने कोसळलेली क्रेन उचलण्याचे काम सुरु होते.

मणेरी ते वेंगुर्ला या जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मंगळवारी बांदा आळवाडा येथे दहा वाजण्याच्या सुमारास काँक्रीटचे काम क्रेनच्या सहाय्याने सुरु होते. रात्रीच्या वेळी ऑपरेटरला अंदाज न आल्याने क्रेन तेरेखोल नदीपात्रात उलटली. अपघाताच्या आवाजानंतर बांदा ग्रामस्थांनी तेथे धाव घेत मदतकार्य केले. किरकोळ दुखापत वगळता कोणालाही सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. रात्रीच्या वेळी जोखमीचे काम करत असताना किमान पुरेशी वीज व्यवस्था तरी करा असे खडे बोल उपस्थितांनी तेथील कामगारांना सुनावले. अत्यंत धीम्या गतीने सुरु असलेल्या कामाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!