दोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मुळस-हेवाळे पूलासंदर्भातील उपोषणस्थळी संतापाचे वातावरण..

▪️येत्या मंगळवार पर्यंत प्रशासनाला जाग न आल्यास प्रशासनाला कोणतीही पुर्व कल्पना न देता कोणत्याही क्षणी रास्ता रोको किंवा जल समाधी..

▪️त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्तिथीस केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार; उपोषणकर्त्यांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला वसलेले गाव म्हणजे हेवाळे सन १९८० सालापासून हेवाळे गावाला मुख्य राज्यमार्गाला जोडणारा रास्ता अस्तित्त्वात आला. त्यानंतर तेरवण मेढे येथे ऊन्यई बंधाराचे बांधकाम  करण्यात आले.या बंधाऱ्याच्या जलाशयाच्या पाण्याखाली सदरचा रस्ता गेल्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आला व पर्यायी मार्ग म्हणून  मुळस येथून हेवाळे गावाला जोडणारा नवा रस्ता १९८९ साली बांधण्यात आला. या रस्त्यावर मुळस या ठिकाणी जलसंपदा विभागाकडून खरारी नाल्यावर नवीन कॉजवे बांधण्यात आला.सदरचा कॉजवे पावसाळ्यात पाण्याखाली जात असतो त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात हेवाळे गावात जाण्यासाठी खराडी ब्रिज येथून पर्यायी वाटेचा वापर करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांचे तसेच शाळकरी मुलांचे अतोनात हाल होत असतात. याच कॉजवे वरून १९९८ साली पास्कु लोबो यांची आई तसेच २००३ साली आप्पासाहेब दत्ताराम देसाई व आप्पासाहेब आत्माराम देसाई हे दोघे २९ वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून मृत्युमुखी पडले होते.या तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी दिली जाईल असे जलसंपदा विभागाकडून आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यंत या कुटुंबातील एकाही सदस्याला नोकरी किंवा कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळं या कुटुंबांची परिस्थितीत हालाकीची आहे.कुटुंबातील कर्ता पुरुष नसल्यामुळे घर चालवण्यासाठी या कुटुंबातील व्यक्तीना मोलमजुरीवर अवलंबून राहावे लागत आहे. या कॉजवे वरून दर पावसाळ्यात गायी-म्हैशीं सारखी पाळीव जनावरे वाहून जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. हेवाळे गावासाठी रास्त दराचे धान्य दुकान, पोस्ट ऑफिस, तलाठी ऑफिस मेढे येथे कार्यान्वित आहे. तसेच इ. ७ वीच्या पुढील विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणाच्या सोयीसाठी सोनावल,भेडशी व दोडामार्ग याठिकाणी जावे लागते.

या सर्वांना सोयीचा मार्ग हेवाळे मुळस मार्गेच आहे. त्यामुळे मुळस येथे  काजवेच्या ठिकाणी मोठा पूल व्हावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. जेणेकरून पावसाळी हंगाम्यांत बारमाही वाहतूकी पासून वंचित असणारा मार्ग बारमाही वाहतुकीसाठी वापरता येईल.

मुळस हेवाळे पुलासाठी गेल्या वीस वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी आहे. मागील पाच वर्षात या पुलाचे स्वप्न साकार होईल असे वाटत होते. परंतु पुलासाठी काही प्रयत्न न करता केवळ निवडणुकीच्या वेळी ग्रामस्थांना आश्वासने देऊन या पूलाचा फक्त राजकारणासाठी वापर करण्यात आला. मागील पाच वर्षात ग्रामपंच्यातीत ज्या पक्षाची सत्ता होती. त्यांनी पाच वर्षात केवळ अश्वासनच दिली आणि मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंच्यात निवडणूकीच्या प्रचारावेळी पुन्हा एकदा या पुलाचा वापर राजकारणासाठी करण्यात आला. त्यावेळी काही ग्रामस्थांकडून यास विरोध झाल्याने व ग्रामपंच्यातीत त्या पक्षांची सत्ता येण्याची शक्यता कमी झाल्याने ऐनवेळी आमच्या पक्षाची सत्ता नसेल तर पुलाचे काम होणार नाही. अशी धमकी वजा प्रचार करण्यात आला. त्यामुळे मतदारांनी त्या पक्षाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे व ग्राम विकास पॅनलकडे एक हाती सत्ता दिलेली आहे. त्यामुळे ग्राविकास पॅनलनेही सरपंच पदाची निवडणूक होताच दुसऱ्या दिवशीपासून प्रशासनाल जाग आणण्यासाठी मुळस-हेवाळे पुलाचा मुद्दा उचलून धरत बेमुदत उपोषण पुकारले आहे. परंतू गेले तीन दिवस प्रशासनास पुर्ण सहकार्य करीत सुरू असलेल्या उपोषणाची कोणत्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतलेली नाही.  तसेच त्या पक्षाकडून प्रशासनावर राजकीय दबाव आणीत सुरू असलेले उपोषण असफल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांच्या संयमाचा उद्रेक झाल्यास त्यास पूर्णपणे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असणार आहे. म्हणूनच आमरण उपोषणाचे रूपांतर साखळी उपोषणात केल्यानंतर येत्या मंगळवार पासून कधी प्रशासनास कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता कोणत्याही वेळी रात्री अपरात्री जलसमाधी किंवा रास्ता रोको करण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्तिथीस केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील. असा इशारा  उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला.

यासाठी कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग युद्धपातळीवर मान्यतेचा प्रस्ताव सादर करून त्यास मान्यता घेणे भाग पडणार असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!