चिपळूण येथील ३० वर्षीय कर्करुग्णास मिळाले जीवनदान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : चिपळूण
🎴चिपळूण,दि.१५: येथील ३० वर्षाच्या युवकाला टी सेल लिम्फोब्लास्टीक कॅन्सरचे निदान झाले. डॉ. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर व नंतर साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे दाखल करण्यात आले. रुग्णाच्या पहिल्या दोन केमोथेरेपी यशस्वीरित्या पार पडल्या. मात्र, तिसऱ्या केमोथेरेपीनंतर रुग्णाच्या अंगावर लाल रंगाचे चट्टे येऊन त्यात पु जमा होऊ लागला. काही दिवसांमध्ये संपुर्ण शरीरावरच असे चट्टे पहायला मिळाले.
रुग्णाच्या घशालाही जखमा होऊन त्याला पाणी पिण्यासही अशक्य होऊ लागले. रुग्णाला सतत ताप येण्यास सुरुवात झाली व हा संसर्ग रक्तात पसरु लागला. या कारणांमुळे रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊन त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रुग्णाला अन्न आणि पाण्याचे सेवन करणे देखील मुश्कील होऊ लागल्याने त्याला सलाईनच्या माध्यमातून पोषक घटक पुरविण्यात येऊ लागले. रुग्णाचा रक्तदाब देखील खालावू लागल्याने त्यानुसार औषधोपचार सुरु करून रक्तदाब सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्णाला उच्च प्रतीची प्रतिजैविक सुरु करण्यात आली. वीस दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर रुग्णाची प्रकृती सुधारु लागली. त्याच्या शरीरातील पेशींची संख्या वाढून रक्तातील संर्सग देखील हळूहळू कमी होऊ लागला. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीतून रुग्णाच्या गुणसुत्रात दोष असल्याचे आढळून आले. आणि याच कारणामुळे केमोथेरेपीचे गंभीर दुष्परिणाम आढळून आले. आता रुग्णाची चौथी केमोथेरेपी पूर्ण होत असून तो बरा होत आहे. रक्ताचे कर्करोग हे योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात. केमोथेरपीचे दुष्परिणामांचे देखील निदान झाल्यास ते आटोक्यात आणता येतात. रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यानुसार औषधोपचार केल्यास तो लवकर बरा होऊ शकतो. डॉ. विनोद पाटील यांनी रुग्णाला नव्याने जीवनदान दिले असून याकरिता प्रोत्साहन दिल्याबद्दल ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर चे चेअरमन श्री. उदय देशमुख तसेच लाईफ केअर चे डॉ इसहाक खतीब व श्री. राजे महाडिक यांचे विशेष आभार मानले. या जोखमीच्या उपचारास डॉ. विनोद पाटील यांना डॉ. गौरव जसवाल, डॉ. किरण जगताप, डॉ. कबीर मुलाणी, डॉ. तेजस भोसले, डॉ. उत्तरा पाटील, डॉ. भगवान उगले, डॉ. रेवती पवार सहायक डॉक्टर व नर्सेस यांची मोलाची साथ लाभली.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

