मटका, गुटखा, सिगारेट, तंबाखू विक्रेतांचा कर्दनकाळ सावंतवाडीचे मुख्याधिकारी जावडेकर..
▪️सावंतवाडी शहरातील मटका व्यावसायिक धास्तावले; अनेक टपरीवर टाकल्या धाडी
▪️आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा केला सदुपयोग..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अवैधधंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. या धंद्यांना वेसण कशी घालायची व युवा पिढीला कसे वाचवायचे हा सर्वांसमोर यक्षप्रश्न असतानाच आम्ही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या माध्यमातून अवैध दारू धंद्यांवर जोरदार प्रहार करून झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे केले, त्यातून जिल्ह्यातील १६ जणांवर तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करुन तो प्रांताधिकारी यांच्याखडे पाठविला गेला. त्यातच एक जोड म्हणून सुरुवातीला सावंतवाडीचे मुख्याधिकारी असलेले जयंत जावडेकर अवैध धंद्येवाल्यांचे कर्दनकाळ ठरले आहेत.
मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतानाही लॉकडाऊन काळात त्यांनी आपल्याला मिळालेल्या अधिकारामुळे अनेक अनैतिक धंद्यांना चाप लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यातच त्यांची सावंतवाडी नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून पून्हा नेमणूक झाली.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मिळालेल्या अधिकारात त्यांनी सावंतवाडी शहरातील ज्या दुकानांमध्ये खुलेआम मटका, सिगारेट, तंबाखू, विक्री होत आहे, अशा दुकानांवर धाडी टाकून त्यांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने अनेक अनैतिक व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. सार्वजनिक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कालावधीत अशाप्रकारची सिगारेट, गुटखा, तंबाखू, मटका हे व्यवसाय अवैध आहेत, ते कोणी करू शकत नाहीत म्हणून अशा व्यवसायांवर कारवाईचे सत्र जयंत जावडेकर यांनी सुरु करुन जे धाडस केले आहे, त्या धाडसाचे खऱ्या अर्थाने कौतुक केले पाहिजे.
अनेक जणांनी मुख्याधिकारी यांना अशा प्रकारचे अधिकार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. मुख्याधिकारी अशी कारवाई करत असताना त्यांना हवे तसे पोलिसांचे संरक्षण मिळेनासे झाले. तेव्हा थेट पोलिस अधीक्षकांच्या दरबारी हजर होऊन आपले म्हणणे मांडून मुख्याधिकारी जावडेकर यांनी पोलीस संरक्षणही मिळविले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आम्ही सुरुवातीलाच लिहिले होते. मुख्याधिकारी जयंत जावडेकर गरिबांच्या प्रती प्रेम असलेले, हृदय असलेले, मुख्याधिकारी आहेत. कोणाच्या पोटावर मारायचे नाही.. पाठीवर मारा.. स्वतःचे पोट भरताना इतरांच्या पोटाचा विचार करा.. इतरांच्या शरीराला इजा होईल अशा प्रकारचे वर्तन करू नका.. स्वतःचा स्वार्थ साधत असताना इतरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.. सनदशीर मार्गाने धंदा करा अशी पंचसुत्री उराशी बाळगून मुख्याधिकारी जयंत जावडेकर काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत थोडीशी हटके असली, तरी त्यांच्या पद्धतीवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. कारण त्यांचा हेतू साफ आहे.
सावंतवाडी शहरात राजरोसपणे सुरू असलेले मटका, गुटखा, सिगारेट, तंबाखू विक्री अगदी शाळेच्या बाजूला सूरु असलेल्या टपरी यावर केली जाते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे, त्याचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. सावंतवाडीच्या इतिहासात अशा प्रकारचे काम कुठच्याही मुख्याधिकार्यांनी केले नव्हते. किंबहुना यापूर्वीचे मुख्याधिकारी जिरगे हे कोरोना काळात सुद्धा सावंतवाडीत दिसले नाहीत. त्यावर क** शब्दात टीकाही केली होती. सावंतवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे निष्क्रिय मुख्याधिकारी मिळाले म्हणून.. मात्र, जयंत जावडेकर स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतात व त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. गरिबांन प्रति असलेले त्यांचे प्रेम अनेक वेळा दिसून आले. मात्र, कोणाच्याही दडपणाला बळी न पडता स्विकारलेली नोकरी प्रामाणिकपणे करायचे. एकतत्व उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे. भविष्यात त्यांनी अशा प्रकारची कारवाई सुरू ठेवल्यास सावंतवाडीत त्यांच्याविरुद्ध नाराजीचा सुरु उमटेल मात्र, अनेक कुटुंबांचे आशीर्वाद त्यांना मिळणाऱ यात शंका नाही. त्यामुळे त्यांच्या या लढ्याला कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचा पूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
तुम्ही जे सध्या काम करत आहात ते आमच्यासारख्या तरुणांसाठी एक आदर्श ठेऊन जाणार आहे. यामध्ये आमचा हातभार लागला तर आम्ही नक्कीच नशीबवान आहोत असं म्हणणं चुकीचं होणार नाही. पण नागरिकांना आपले अधिकार वापरता आले तर बराच बदल या सिस्टिम मध्ये होऊ शकतो. आणि यासाठी मला कोंकण ब्रेकिंग लाईव्ह चा डॅशिंग मंच योग्य आणि पुरेसा आहे असं वाटत.
धन्यवाद ।
धन्यवाद