निगुडे- सोनुर्ली एसटी बस सेवा कायमस्वरूपी सुरू करा : गुरूदास गवंडे
*निगुडे- सोनुर्ली एसटी बस सेवा कायमस्वरूपी सुरू करा अन्यथा २८ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी आगर व्यवस्थापक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार- गुरूदास गवंडे निगुडे माजी उपसरपंच यांचा एसटी प्रशासनाला इशारा*
बांदा प्रतिनिधी: विभाग नियंत्रक रा.प.म. सिंधुदुर्ग, विभाग कणकवली यांना निगुडे माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी सावंतवाडी रेल्वे स्टेशन सोनुर्ली निगुडे बांदा व परत अशाप्रकारे आपण एसटी सुरू करण्यासाठी मागणी केलेली होती .वारंवार एसटी प्रशासनाकडे मागणी करूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात होतं त्यामुळे विभाग नियंत्रक रापम कणकवली यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री.गुरुदास गवंडे यांनी निवेदन दिलेल आहे आणि त्या निवेदनात त्यांनी एकूण ११ फेऱ्यांची मागणी केलेली आहे परंतु विभाग नियंत्रक रापम कणकवली यांनी सावंतवाडी सोनुर्ली विस्तारित बांदा सकाळी ०९:०० वाजता व परत बांदा सोनुर्ली सावंतवाडी सकाळी ०९:५५ वाजता सावंतवाडी सोनुर्ली विस्तारीत बांदा दुपारी ०२:०० वाजता व परत बांदा सोनुर्ली सावंतवाडी दुपारी ०२:५५ वाजता सावंतवाडी सोनुर्ली विस्तारित बांदा संध्याकाळी ०५:०० वाजता, व परत बांदा सोनुर्ली सावंतवाडी संध्याकाळी ०५:५५ वाजता फेऱ्या या दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर विस्तारित करण्यात येणार आहेत अशा आशयाचे लेखी पत्र दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ दिले परंतु मागणी केलेल्या अन्य बसेस संदर्भात तिकीट दरवाढ करणार येणार आहे असे हे पत्र विभाग नियंत्रक रा.प.म कणकवली यांनी दिलेल आहे परंतु श्री गुरुदास गवंडे हे अन्य फेऱ्या चालू करा व त्या कायमस्वरुपी चालू राहतील व मागे ज्या पद्धतीने बसेस चालू केल्या होत्या व सावंतवाडी बस स्थानक, सोनुर्ली ते निगुडे तिठा अशा बस चालू करून धुळफेक करण्याचा प्रयत्न रा.प.म एसटी प्रशासनाने केला होता त्यामुळे आपण आपल्या उपोषणावर ठाम आहोत दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता आगर व्यवस्थापक सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर आपण व अन्य गावातील लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपोषणास बसणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे एसटी प्रशासनाने याची योग्य दखल न घेतल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आहे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे

