संपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोट्यवधी रुपयांची चोरटी दारू वाहतूक करुन महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांवर तस्करीचे गुन्हे दाखल करा..

▪️एकच गून्हा पून्हा-पून्हा करुन ही चोरटी दारु तस्करी करणाऱ्यांवर तडीपारची कारवाई का होत नाही?

▪️राज्य उत्पादन दारुबंदी खाते कशासाठी! फक्त हप्ते गोळा करायला का?

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.२३: पत्रादेवी येथून गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्गात आणून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून राजरोसपणे कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या दारू दलालांवर अनेक वेळा त्यांना पकडूनही दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी त्यांच्यावर तडीपार ची कारवाई का करत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. एकाच गुन्ह्यात तोच आरोपी पुन्हा-पुन्हा मिळाला तर त्याला तडीपारीची कारवाई होऊ शकते. असे असताना दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग ती का करत नाहीत  की, या अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा झाला आहे. असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
गेले अनेक वर्षे गोव्यावरून महाराष्ट्र शासनाचा कर बडवून गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्गात आणून तिची लेबले बदलून तिला महाराष्ट्राचे लेबल लावून पुन्हा ती बाटली सिल पॅक करून विकली जाते, हे सावंतवाडीतील एका आलिशान घरात राजरोसपणे सुरु आहे. व त्याची माहिती दारूबंदी उत्पादन शुल्काच्या अधिकार्‍यांना असावी असा आमचा संशय आहे. मात्र, या अधिकाऱ्यांना मोठे हप्ते मिळत असल्याने हे आकडे माहीत असूनही यावर कानाडोळा केला जात आहे. वारंवार एकाच गुन्ह्यात सापडणाऱ्यांवर  तस्करीचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सावंतवाडी शहर हे दोन नंबर धंदेवाल्यांचे माहेरघर आहे. या शहरात दारू तस्करी करणारे वीस ते पंचवीस जण कार्यरत आहेत. त्यांच्यावर अनेक वेळा वेगळ्या स्वरूपाची कारवाई झाली आहे. एकाच गुन्ह्यात या आरोपीना अनेक वेळा अटक केली असताना त्यांच्यावर तडीपारीची कारवाई का होत नाही. असा प्रश्न विचारला जात आहे. यासंबंधी संशयित आरोपींची फाईल राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे असतानासुद्धा याकडे डोळेझाक करत असल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याचा संशय आहे. गोवा येथून दारू आणून सिंधुदुर्गात चौपट भावाने विकणारे हे दारूबंदी वाल्यांचे रॅकेट अल्पावधीतच करोडपती झाले आहे. तर कॉलेज युवक झटपट श्रीमंत होण्याच्या ईर्षेने या धंद्याकडे ओढले गेल्याने बक्कळ पैसा मिळवण्याच्या नादात आपले आयुष्य उध्वस्त करीत आहेत. मात्र, यासाठी स्वतंत्र खाते असणारे दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी डोळे झाकून गप्प पडून आहेत. कारण या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात हप्ता आत्ता सुरू असल्याने ते कोणतीही कारवाई करताना आढळून येत नाहीत.
गोव्यातून सिंधुदुर्गात दारू वाहतूक करणारे व त्यांचे पायलटींग करणारे ते कोणीही असूदेत शासकीय-निमशासकीय  शिपाई, अधिकारी, जे कोणी असतील त्यांच्यावर त्यांना गुन्ह्यास सहकार्य केले म्हणून कारवाई व्हायला हवी अशा मताचा मी आहे. कारण गोव्यातून सिंधुदुर्गात येताना अनेक ठिकाणी तपासणी नाके लागतात. या तपासणी नाक्यांवर दारूने भरलेल्या गाड्या कशा सुटतात व त्यांची नजर चुकवून जर या गाड्या येत असतील, तर हे तपासणी नाके हवे कशाला? असे आमचे स्पष्ट मत आहे.
त्यामुळे हा दारू वाहतुकीचा प्रकार संगनमताने घडत असावा व त्याला मदत करणारे अधिकारी त्यांचे शासकीय शिपाईही त्यात सामील असावेत असा अंदाज आहे. राज्य दारूबंदी उत्पादन शुल्काच्या पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे आमचे मत होते. मात्र, त्यांच्या कृत्यावर पांघरूण घालण्याचे काम राज्य उत्पादन दारुबंदी पोलीस अधीक्षक करत असल्याने त्यांच्याविरोधात त्यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालया समोर बोंबाबोंब आंदोलन करावे लागणार आहे.
दारु बंदी खात्याच्या अधिकाऱ्यांना वारेमाप हप्ता मिळत असल्याने तुम्ही कितीही टीका करा, काहीही लिहा, तरी आम्ही या दोन नंबर धंदेवाल्यांचे संरक्षण करणार असा चंग या अधिकाऱ्यांनी बांधला आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. ‘शेंडी तुटो वा पारंबी’ या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. कारण आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. अनेकांनी यापूर्वी अनेक खोटी प्रकरणे करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. ही प्रकरणे त्यांच्यावरच उलटली, हा इतिहास आहे. ज्यांनी-ज्यांनी आम्हाला हर एक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा भविष्य काळ रसातळाला गेला. याचे अनेक साक्षीदार आहेत. कारण या पाटेकरच्या भूमीत असत्य कधीच टिकत नाही. ज्याने असा प्रयत्न केला, त्यांचा पुढील काळ इतिहास जमा हाही एक इतिहास आहे.
आमची लढाई सत्याची तत्त्वाची प्रामाणिकपणाची आहे. त्यामुळे ईश्वर त्याला साथ देणारच व आमचा विजय होणारच…

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!