कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने पुरस्कार वितरण संपन्न
*कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने पुरस्कार वितरण संपन्न*
*ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर भरत केसरकर तर छायाचिकार जतीन भिसे यांना पुरस्कार प्रदान*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
पत्रकारिता ही विकासाभिमुख असले पाहिजे प्रशासन आणि पत्रकार यांच्यामधील संवाद महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळावेळी केले. या सोहळ्यामध्ये व्याध कार भैय्यासाहेब वादावलकर जिल्हास्तरीय पुरस्कार दैनिक प्रहार चे संपादक संतोष वायंगणकर वसंत दळवी ग्रामीण पुरस्कार कोकण सादचे भरत केसरकर उत्कृष्ट छायाचित्रकार जतिन भिसे यांना सन्मानित करण्यात आला.
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने पुरस्कार वितरणाचे आयोजन बॅ. नाथ पै महाविद्यालय करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्ष विजय पालकर, कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील श्री दळवी जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी राजन नाईक बाळ खडपकर आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले की, प्रशासन चालवत असताना पत्रकारांची साथ आवश्यक आहे पण पत्रकार आणि सुद्धा बातम्या देत असताना विकासात्मक बातम्या द्याव्यात कुठे चुकत असेल तर पत्रकारांनी त्या चुका दाखवाव्यात प्रशासन आणि पत्रकार आणि एकत्र मिळून काम केले तर विकासाची गंगा येऊ शकते असे त्यांनी सांगितले तर यावेळी पुरस्कार प्राप्त दैनिक प्रहार चे संपादक संतोष वायंगणकर यांनी सांगितले की, पत्रकारांनी कोणत्याही गोष्टीचा पूर्णपणे विचार करून आपले लेखनी केली पाहिजे समाजावर त्याचे कोणते परिणाम होतील याचाही विचार झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सी वर्ल्ड सारखा प्रकल्प येणार होता पण त्याला काही पत्रकारांनी चुकीच्या पद्धतीने मांडणी केल्यामुळे लोकांमध्ये त्याबद्दल आक्रोश निर्माण झाला ही पत्रकारिता अपेक्षित नाही पत्रकारितेमुळे आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे आम्हीच बेरोजगारीवर बोलणार आणि येणाऱ्या रोजगारांना ठोकर मारणार ही चुकीची गोष्ट आहे आपल्या जिल्ह्याच्या नुकसानीचे जे काही प्रकल्प येतात त्याला निश्चित विरोध केला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते दादा साईल नागेश आईर गंगाराम सोडवेलकर यांचे सत्कार कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी केले तर आभार अजय सावंत यांनी मानले

