अवकाळी पडलेल्या मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे कसाल परिसरात लाखोचे नुकसान
*अवकाळी पडलेल्या मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे कसाल परिसरात लाखोचे नुकसान*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
कूडाळ तालुक्यातील कसाल परिसरात काल रात्री वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या सोसाट्याच्या वार्यात बरोबर मुसळधार पावसाने कसाल परिसरासह आजूबाजूचा परिसर झोडपून काढले. पावसामुळे गारव्याचा आनंद मिळाला मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने तसेच शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या व ढगांचा गडगडाट परिसरात पाऊस कोसळत होता. रस्त्यांवर अनेक ठिकाणी भली मोठी झाडे पडली होती त्यामुळे रस्ते बंद झाले होते तसेच घरांचे पत्रे कवले छप्पर गुरांचे गोठे केळी आंबे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे