रोटरी क्लब सिंधुदुर्ग तर्फे कोविड पश्चात मार्गदर्शन शिबिर
*रोटरी क्लब सिंधुदुर्ग तर्फे कोविड पश्चात मार्गदर्शन शिबिर* *प्रतिनिधी सुनील आचरेकर* *कसाल* कोविडमधून बरे झाल्यानंतर न्यूमोनिया झालेल्या रुग्णांनी फुप्फुसांची काळजी कशी घ्यावी यासाठीची कार्यशाळा नुकतीच कोलते हॉस्पिटल कसाल येथे घेण्यात आली. यावेळी रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोलते यांनी फुप्फुसांची क्षमता चांगली ठेवणे किती महत्त्वाचे आहे. हे विषद करून सांगितले. चेस्ट फिजिओथेरपीस्ट डॉ उन्मेश पटवारी यांनी फुफ्फुसांचे व्यायाम प्रत्यक्षिकाद्धारे दाखवले. विशाल परब यांनी इनहेलर्स बदल माहिती दिली सिप्ला कंपनीचे निलेश खाडे यांनी काही रुग्णांची मोफत फुप्फुस क्षमता तपासणी केली. कोविड मधून बरे झालेल्या दहा व्यक्तीने या शिबिराचा लाभ घेतला.

