मालवणराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वॉटर स्पोर्ट्स प्रश्न निकाली काढा..

▪️माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची मेरीटाईम सीओ व राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : मालवण

🎴मालवण,दि.१४: मालवणसह कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेले वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास बंदर विभाग (मेरीटाईम) परवानगी देत नसल्याप्रश्नी माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांनी मेरीटाईम बोर्ड मुंबई सीओ अमित सैनी व राज्याचे प्रधान सचिव संजय कुमार यांच्याशी चर्चा केली.

कोरोना पार्श्वभूमीवर वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्याबाबत आवश्यक असलेली नियमावली (एसओपी) लवकरात लवकर मंजूर करून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास परवानगी द्या. अशी मागणी वजा सूचना राणे यांनी केली आहे. याला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या खासदार नारायण राणे यांच्याकडे वॉटर स्पोर्ट्स समस्या व्यवसाईकांच्या वतीने मांडण्यात आल्या. बंदर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पर्यटनावर परिणाम होत असल्याबाबतही लक्ष वेधण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संध्या तेरसे, रणजित देसाई, राजू राऊळ, सुनील बांदेकर, भाई मांजरेकर व अन्य उपस्थित होते.

राणे यांनी सुरवातीला मेरीटाईम बोर्ड सीओ अमित सैनी यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. कारवाई कोणत्या कारणासाठी केली जात आहे याबाबत माहिती घेतली असता कोरोना खबरदारी नियमावली अद्याप मंजूर झाली नसल्याची माहिती समोर आली. त्यांनंतर राणे यांनी प्रधान सचिव सजीव कुमार यांच्याशी संपर्क साधून एसओपी लवकरात लवकर मंजूर करण्याबाबत चर्चा केली. एकूणच वॉटर स्पोर्ट्स व्यवसाईकांच्या अन्य समस्याही सोडवण्याबाबत राणे यांनी मेरीटाईम सीओ यांच्याशी चर्चा केली आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!