२७ वर्षांची सामाजिक बांधिलकी कायम; ‘रासाई’च्या अध्यक्षपदी पुढील तीन वर्षा साठी कृष्णा लाखे!
श्री रासाई युवा कला-क्रीडा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड; सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाला नवी दिशा
सावंतवाडी : गेली तब्बल २७ वर्षे समाजाची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या श्री रासाई युवा कला-क्रीडा मंडळाच्या वर्ष २७ व्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कृष्णा जगन्नाथ लाखे यांची पुढील तीन वर्षांसाठी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडळाने गेल्या २७ वर्षांच्या वाटचालीत केवळ कला-क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत समाजाला एकत्रित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते सातत्याने सक्रिय राहून समाजातील बांधवांना एकत्र आणण्यासाठी आणि सामाजिक सलोखा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत.
नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विकी चंद्रकांत लाखे, सचिवपदी सागर वसंत लाखे, खजिनदारपदी लखन धर्मेंद्र पाटील, तर कार्याध्यक्षपदी रोहित शंकर लाखे यांची निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे.
*नव्या कार्यकारिणीवर मोठी जबाबदारी*
२७ वर्षांची गौरवशाली परंपरा पुढे नेत मंडळाच्या माध्यमातून भविष्यात आणखी व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि क्रीडा उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या नेतृत्वामुळे मंडळाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा लाखे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचे समाजबांधव, हितचिंतक आणि मित्रपरिवारातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

