पालिकेच्या पाणीपुरवठा वेळेबाबतच्या निर्णयाने नागरिक रस्त्यावर उतरतील; जाधव यांचा इशारा
▪️वर्षभरात किती नळ कनेक्शन वाढली हे पालिकेने जाहीर करावे..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१४: नगरपालिकेने शहरात पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेबाबत घेतलेला निर्णय नागरिकांचा मानसिक छळ करणारा आहे. या निर्णयाचा पालिकेने फेरविचार न केल्यास नागरिकांचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरतील. जे २५ वर्षात झाले नाही, ते विद्यमान सत्ताधाऱ्यांनी एक वर्षात करून दाखविले, असा टोला पालिकेचे माजी सभापती विलास जाधव यांनी हाणला आहे.
सावंतवाडी पाणीपुरवठा विभागाचा कारभार भोंगळ होत चालला आहे. त्याचे मूर्तिमंत उदाहरण हा निर्णय असून हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी शहराला केसरी, कुणकेरी पाळणेकोंड आणि नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रयत्नातून नरेंद्र डोंगरावरून पाणीपुरवठा होतो. पाळणाकोंड धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. नागरिकांना अधिक पाणीपुरवठा होण्यासाठी गोडबोले गेटची उंची एक मीटरने वाढविली आहे. पुरेसा पाणीसाठा असताना उन्हाळ्याऐवजी हिवाळ्यात एकवेळ आणि तेही वेगवेगळ्या वेळेत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा निर्णय दुर्दैवी आणि नागरिकांचा मानसिक छळ करणारा आहे. या निर्णयाबाबत नागरिकांत संताप असून याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे. नागरिकांमध्ये पालिकेबबत उद्रेक असून तो उफाळून येणारा आहे. त्यामुळे पालिकेने याचा फेरविचार केला पाहिजे, असे श्री. जाधव यांनी सांगितले.
शहरात नळकनेक्शन वाढल्याचे पालिका सांगत आहे. गेली २५ वर्षे असा निर्णय घेतला गेला नाही. वर्षभरात अशी किती कनेक्शन वाढली, हे पालिकेने जाहीर करावे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
पालिकेने नागरिकांचा छळ करण्यापूर्वी आम्ही शासनाकडे केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

