वैभवाडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोडत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली; तहसीलदार यांची माहिती
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वैभवाडी
🎴वैभववाडी,दि.१४: तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोडत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तालुक्यातील होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर ही सोडत प्रक्रिया होणार असल्याची माहिती वैभववाडी तहसीलदार कार्यालयातून प्राप्त झाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्देश आल्याचेही त्यांनी सांगितले. वैभववाडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी १६ डिसेंबर रोजी सोडत प्रक्रिया होणार होती. हा कार्यक्रम वैभववाडी तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे होणार होता. पण आता ही सरपंच पदाची सोडत प्रक्रिया पुढे ढकलण्यात अली असल्याची माहिती वैभववाडी तहसिलदार रामदास झळके यांनी दिली. त्यामुळे पुढील सरपंच पदांचे आरक्षण निवडणूक आयोगाच्या आदेशाने घेण्यात येतील असेही तहसीलदार यांनी सांगितले आहे. त्यामुळे अजून काही काळ सरपंच पदाच्या आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने आता इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

