नासीर काझी यांनी पक्षसंघटनेत केलेल्या कामाचा आदर्श इतरांनीही घ्यावा; खा.नारायण राणे
▪️माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नासीर काझी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१६: माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी तालुका मंडळ अध्यक्षपदी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नासीर काझी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. नासीर काझी यांच्या अंगी असलेले नेतृत्वगुण हे कौतुकास्पद आहेत. वैभववाडी तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष पदावर त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श इतरांनीही घ्यावा. मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता असून देखील पक्षसंघटनेत सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांनी काम केले आहे. त्याचे अनुकरण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी दिली.
यावेळी भाजप आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. बँक संचालक अतुल काळसेकर, माजी आ. आप्पासाहेब गोगटे, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
नासीर काझी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या विविध कार्यकारण्या, आघाड्या गठीत झाल्या आहेत. कोरोना काळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी प्रचार यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबवली. स्वतःला झोकून देत पक्षसंघटनेत दिलेल्या योगदानाची पोचपावती खा. राणे यांच्याकडून त्यांना मिळाली आहे. त्यांचा सन्मान झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

