कोलगांवातील पं. दीनदयाळ उपाध्याय ग्राम विलगीकरण कक्षाचा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंच्या हस्ते झाला शुभारंभ
जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची बिकट परिस्थिती; पालकमंत्र्यांना लाज वाटत नाही का???नारायण राणेंची टिका
सावंतवाडी दि. १४: कोलगाव तिठा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय ग्राम विलगीकरण कक्षाचा शुभारंभ आज माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. हा विलगीकरण कक्ष ३० बेडचा आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद आरोग्य सभापती अनिशा दळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, पंचायत समिती सभापती निकिता सावंत,पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, नगरसेवक परीमल नाईक, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जि.प.सदस्या रेश्मा सावंत, मोहिनी मडगावकर, मेघना साळगावकर, सरपंच संतोष राऊळ,उपसरपंच दिनेश सारंग,ग्रा.पं.सदस्य आदींसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. मृत्युदरही वाढत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार करतायत काय ? सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय नाहीत. यामुळेच कोरोना वाढत असून दातांचे, स्कीनचे डॉक्टर कोरोना पेशंट तपासत आहेत. राज्य सरकारला, पालकमंत्र्यांना लाज वाटत नाही का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री खा नारायण राणे यांनी केला. तर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांची आपण भेट घेणार असून याबाबत त्यांचाशी बोलणं झालं आहे. त्यांची भेट घेऊन जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जातिनिहाय लक्ष घालणार असल्याचा शब्द खा. नारायण राणे यांनी दिला.

