डिवायएसपी रोहिणी साळुंखे यांचा आदर्श जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांनी घ्यावा..
▪️गोव्यातून येणारी अवैध दारू वाहतूक डीवायएसपी साळुंखे सारखेच प्रामाणिक अधिकारी बंद करू शकतील..
▪️पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ख्याती ते ही जबाबदारी उचलतील अशी अपेक्षा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.२८: गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या दारूला हजार वाटा असल्या तरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणारे अधिकारी जर सेवेत असतील तर अशा वाटा बंद करून अवैध मद्य साठा जप्त करण्याचे धारिष्ट दाखवू शकतात. अशा प्रकारचे धारिष्ट सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी दाखवून खऱ्या अर्थाने महिलाही कुठच्याच क्षेत्रात कामात मागे नाही हे दाखवून दिले आहे. व रणरागिणीचे रूप धारण करत हजर झालेल्या पहिल्याच महिन्यात जवळपास ७० लाखांची अवैध दारू जप्त करून दारू माफियांना दणका दिल्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने आम्ही त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो.
अशा प्रकारचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, आपल्या सेवेला व कर्तव्याला जागणारे अधिकारी सिंधुदुर्गाला लाभले तर निश्चितच सिंधुदुर्गाची होणारी उपेक्षा थांबेल. सिंधुदुर्गात होणारे मृत्यू कमी होतील, याची आम्हाला खात्री आहे. गेले महिनाभर गोव्यातून सिंधुदुर्गात येणारी अवैध दारू वाहतूक व दारू तस्कर यांच्या विरोधात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल सातत्याने आवाज उठवत आहे. हा आवाज यासाठीच उठवला जात आहे की, गोव्यातील विषारी दारू पिऊन अनेक जणांनी तारुण्यात आपला जीव गमावला. माझ्या आजूबाजूच्या परिसरातील असे अनेक यूवक ही विषारी दारू पिऊन आपल्या कुटुंबाला आई-वडिलांना बायको-मुलांना सोडून गेलेत. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे आमचे मत होते. संसाराचा सर्वनाश करे दारू बाटलीला स्पर्श नका करू ही शासनाची स्लोगन जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र विषारी दारू महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचत आहे व ती पिऊन हजारो युवक तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच आपला जीव गमावत आहेत. ही खरी शोकांतिका आहे.
राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणी खाऊन सुस्तावले आहेत. या खात्याला कोण वालीच नाही. त्याप्रमाणे कागदी घोडे नाचवायचे शासन दप्तरी दाखविण्यासाठी ठरवून केसस करायचे हा यांचा धंदा याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने पोलखोल केल्यावर राज्य उत्पादन शुल्क खाते जागे झाले. गोव्यातून येणारी अवैध दारू वाहतूक ५० टक्के तरी बंद करण्यात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ला यश आले. उरलेली ५० टक्के दारू साळुंखे सारख्या महिला अधिकारी बंद करतील याचा विश्वास आहे. खात्यात सर्व अधिकारी बरबटलेले नसतात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे अधिकारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असतात. मात्र, सुक्याबरोबर ओलेही जळते या म्हणीप्रमाणे अशा अधिकाऱ्यांचा काही संबंध नसताना त्यांच्यावरही भ्रष्टाचाराची शिंतोडे उडतात.
मात्र कोणी काही म्हणोत आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडायची हे तत्व उराशी बाळगून जे अधिकारी काम करतात, त्यांचे निश्चितच नाव शेवटपर्यंत राहते. तसेच सिंधुदुर्गातील पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचे नाव आजही सिंधुदुर्गातील जनता घेत आहे. अधिकारी येतात बदलून जातात. मात्र, अधिकारी बदलून गेल्यानंतरही ज्यांचे जनतेच्या तोंडात ज्याचे नाव राहते, तो खऱ्या अर्थाने प्रामाणिक अधिकारी असतो. असे आम्हाला वाटते गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या दारूला हजार वाटा आहेत. शोधणाऱ्याला एक वाट व पळून जाणाऱ्या दहा वाटा या म्हणीप्रमाणे हे दारू तस्कर वेगवेगळ्या शकला लढवून वाटा शोधून काढत असतात. त्यामुळे गोव्यातील येणारी अवैध दारू शंभर टक्के बंद होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे. मात्र, प्रामाणिक अधिकारी आपली सेवा, कर्तव्य, प्रामाणिकपणे पार पडत असतील तर गोव्यातून अवैध दारूचा एक थेंब सुद्धा सिंधुदुर्गात येऊ शकत नाही. याची आम्हाला खात्री आहे. मात्र, सर्व अधिकारी डिवायएसपी रोहिणी साळुंखे यांच्या सारखे कर्तव्यदक्ष आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडणारे नसतात. याची जाण आम्हाला आहे. मात्र, इतर अधिकाऱ्यांनी या महिला डिवायएसपींचा आदर्श घेतला तरी गोव्यातून येणार्या दारूला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल. असे आमचे मत आहे.
आल्या आल्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी कारवाईचा धडाका लावला. स्वतः फिल्डवर उतरल्या व दारू माफियांना सळो कि पळो करून सोडले. खरंतर दारू पकडणे हे राज्य उत्पादन शुल्काचे काम मात्र ते अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे पार पडत नसल्याने पोलिसांना ही जबाबदारी घेऊन त्यांचे काम पार पडावे लागत आहे. सिंधुदुर्गातील गावो-गावी आज दारू माफियांची टोळी कार्यरत आहे. त्यामुळे गावातील युवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. काही झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेखातर या धंद्यात उतरले आहेत. मात्र, झटपट पैसे कमावण्याच्या नादात ते आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. हे त्यांच्या ध्यानी येतं नाही हीच खरी शोकांतिका आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व खात्याची परिपूर्ण माहिती असलेले अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून अशा प्रकारचे काम व्हावे अशी आमची इच्छा आहे. सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांचा बिमोड पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे करतील व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ग़ोव्यातून येणाऱ्या अवैध दारूवर चाप लावतील असा आमचा विश्वास आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जर मनावर घेतले तर गोव्यातून होणारी अवैध मद्य वाहतूक ते बंद करू शकतात. त्यांनी तसे मनावर घेऊन गोव्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीला कायमस्वरूपी आळा घालावा अशी आमची मागणी आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
मागे मी लिहील होत कि फक्त दारूचेच गैर व्यवहार होतात का ईथे?बाकी गुन्हे घडत नाही का? त्याकडे लक्ष द्या.गुन्हेगारी नष्ट करा.लोकांच्या तक्रारी कडे लक्ष द्या.त्याच निरसण करा.