वाघाला पिंजऱ्यात बंद करून विजय मिळाल्याचे असुरी समाधान तात्पुरते..
▪️वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खाणार नाही..
▪️सुनिल पेडणेकर यांच्यावरील कारवाई दुर्दैवी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.१२: गुन्हा करणारा कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा असो तो गुन्हेगार असतो. गुन्ह्याला कुठचा रंग नसतो. त्याचप्रमाणे समाजविघातक कृत्य करणारा तो कोणीही असो तो गुन्हेगारच! मग त्याला जात, धर्म, पंथ नाही, असे आपण मानतो. याच गोष्टी ध्यानात ठेवून एखाद्या समाज सुधारकांनी चुकीचे कृत्य केले व त्याच्यावर आपण लिखाण केले, तर ते एखाद्या जातीच्या धर्माच्या विरोधात जाऊ शकते का असा आमचा सवाल आहे.
वास्तविक माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांना आम्ही गेली तीन दशके ओळखतो. त्यांचा स्वभाव आक्रमक तसेच समोरच्यावर तुटून पडण्याची कला नगरसेवक असताना आम्ही जवळून पाहिली. अन्यायाविरुद्ध लढताना समोरची व्यक्ती कितीही मोठी असो त्याची तमा न बाळगता सुनील पेडणेकर यांनी आजपर्यंत लढा दिला. मात्र, हा लढा देत असताना कुठल्याही जाती धर्माच्या, पंथाच्या विरोधात पेडणेकर यांनी उठाव केला नाही. ते सर्व धर्म जाती पंथाचे होते. मात्र, त्यांच्यावर जातीच्या प्रकरणातून एखादा गुन्हा दाखल होतो. तेव्हा मात्र, सुनील पेडणेकर यांच्यातील जातीच्या पलीकडे जाऊन जोपासलेली ती माणुसकीची आठवण येते. पेडणेकर यांच्याकडे सर्व जाती धर्म पंथाचे लोक येत असतात. त्यात दलित समाजाच्या लोकांचा अधिक भरणा असतो. त्यामुळे सुनिल पेडणेकर एखाद्या जाती धर्म पंथाचा विरोधातील असतील आसे आम्हाला कधीच वाटले नाही.
मात्र, एखाद्याने चुकीचे काम केले की, तो कितीही मोठा असो, कोणत्याही धर्माचा, पंथाचा, असो त्याच्यावर तुटून पडायचे हा सुनिल पेडणेकर यांचा स्वभाव गेले अनेक वर्षे आम्ही पाहिला. काही वेळा त्यांचे आमचे तात्विक मतभेद झालेत. मात्र, हे मतभेद कधी जातीपातीच्या कारणाने आले नाहीत. वास्तविक सुनील पेडणेकर हे भंडारी समाजाचे व मी मराठा समाजाचा नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. मात्र, आमचा समाज कधीच एकमेकांच्या कार्यात आड आला नाही.
सुनील पेडणेकर यांनी ज्या माध्यमातून गेले पाच महिने उठाव केला आहे, रान पेटवले आहे, ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. त्याबाबत त्यांना अनेकांचे अभिनंदन केलेल्या चे संदेश आलेले आहेत. जे काय आहे, ते लिहायचे, मागची पुढची परवा करायची नाही, हा त्यांचा स्वभाव आहे. सुनील पेडणेकर यांचा स्वभाव परिणामांची तमा न बाळगता पुढे जाणारा एक जिद्दीचा कार्यकर्ता असे सुनील पेडणेकर यांचे वर्णन करावे.
मात्र, अशीच माणसे सर्वांना खटकतात. मग त्यांना पद्धतशीरपणे बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जाते. कोकण कॉलनी असो किंवा अवैध व्यवसाय असो किंवा एखाद्या वर झालेला हल्ला असो सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनील पेडणेकर यांनी त्यावर जोरदार प्रहार केला. त्यांच्या प्रहारातून शासकीय अधिकारीही सुटले नाहीत. आम्ही कोकण लाईव्ह च्या माध्यमातून सिंधुदुर्गातील अवैध दारू धंद्याविरोधात आवाज उठविला. त्यावेळी आम्हालाही अडकविण्याचा घाट काही लोकांनी घातला. मात्र, आमची नितांत श्रद्धा श्री देव पाटेकर व उपरकर यांच्यावर आहे. कारण या पाटेकरच्या भूमीत असत्य फार काळ तग धरत नाही. यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे सुनील पेडणेकर यांना कोणीही कितीही, काहीही, कसेही, करून अडकवण्याचा, त्यांचा आवाज बंद करण्याचा, त्यांना थांबवण्याचा, प्रयत्न केला, तरी ते थांबणार नाहीत. याचा आम्हाला विश्वास आहे. कारण श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर यांच्या या पवित्र भूमीत खोटे फार काळ टिकत नाही. याची आम्हाला खात्री आहे. नगरसेवक काळापासून ते आतापर्यंत सुनिल पेडणेकर फार मोठे नेते झाले असते. मात्र, आपल्या फटकळ स्वभावामुळे ते थोडे मागे राहिलेत. मात्र, जे आहे ते बोलायचे हा त्यांचा स्वभाव कुठेतरी त्यांच्या यशाच्या किनाऱ्याला बाधक ठरला, असे खेदाने म्हणावे लागते.
मात्र, सुनील पेडणेकर यांनी त्याकडे न पाहता आपली लढाई सुरूच ठेवली. सुनील पेडणेकर यांना सामूहिक प्रयत्न करून अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, सुनिल पेडणेकर त्याला न जुमानता, न घाबरता अधिक जोमाने, अधिक ताकदीने आपला लढा सुरूच ठेवतील यावर माझा विश्वास आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे सुनील पेडणेकर यांचे तत्व आजही कायम आहे. हे या प्रकरणावरून दिसून आले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
सत्याला कशाचीही भीती नसते